ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकलने प्रवास करणाऱ्या मनसे नेत्यांना रेल्वे पोलिसांकडून अटक

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 22, 2020 09:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकलने प्रवास करणाऱ्या मनसे नेत्यांना रेल्वे पोलिसांकडून अटक

शहर : मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले निर्बंध झुगारून लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नेत्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा समावेश आहे. सर्वसामान्य लोकांसाठी रेल्वे सेवा सुरु व्हावी, यासाठी सोमवारी मुंबईत मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले. त्यानुसार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी निर्बंध झुगारत लोकल ट्रेनने प्रवास केला होता. यानंतर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी संदीप देशपांडे, गजानन काळे, संतोष धुरी आणि अतुल भगत यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. विनातिकीट प्रवास करणे, दरवाजात लटकून प्रवास करणे, शासन आदेशाचे उल्लंघन करणे, असा ठपका या नेत्यांवर ठेवण्यात आला होता. त्यामुळे आता मनसे पक्ष आक्रमक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे सामान्य लोकांना आपले कार्यालय गाठण्यासाठी रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, त्यामुळे रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण येत असून सामान्य नोकरदारांचे प्रचंड हाल सुरु आहेत.या पार्श्वभूमीवर मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन पुकारण्यात आले होते. आठ तास ड्युटी आणि आठ तास प्रवास असे का ? लोकल सुरू करा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. एसटी आणि बस वाहतूक सुरु असताना कोरोना पसरत नसेल तर रेल्वे प्रवासातूनच कोरोना कसा काय पसरु शकतो, असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला होता.

मागे

कोरोना व्हायरस : कोव्हिड-19 वरचं औषध शोधण्याच्या कामात किती प्रगती झाली आहे?
कोरोना व्हायरस : कोव्हिड-19 वरचं औषध शोधण्याच्या कामात किती प्रगती झाली आहे?

कोव्हिड-19 आजाराच्या गंभीर रुग्णांना कोणत्या औषधाने फायदा होईल, यावर जगभरात ....

अधिक वाचा

पुढे  

'अशी' होणार पोलीस भरतीसाठीची परीक्षा, फक्त मैदानी चाचणीमध्ये बदल
'अशी' होणार पोलीस भरतीसाठीची परीक्षा, फक्त मैदानी चाचणीमध्ये बदल

यंदाच्या पोलीस भरतीसाठी फक्त मैदानी चाचणीमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर ले....

Read more