ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Mumbai Local | रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई, संदीप देशपांडेंना नोटीस, मनसे आंदोलनावर ठाम

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2020 12:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Mumbai Local | रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई, संदीप देशपांडेंना नोटीस, मनसे आंदोलनावर ठाम

शहर : मुंबई

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. दादर आणि मुंबई रेल्वे पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे. रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा रेल्वे पोलिसांनी मनसेला दिला आहे.

संदीप देशपांडे यांनी 21 सप्टेंबर म्हणजेच उद्या सोमवारी मुंबईत रेल्वेने प्रवास करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. मुंबईकरांचे होत असलेले हाल लक्षात घेत त्यांना रेल्वेने प्रवास करु द्यावा, अशी संदीप देशपांडे यांनी सरकारकडे आग्रही मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी सरकारला एक आठवड्याची मुदत दिली होती.

कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारने सध्या सर्वत्र एपेडिमिक अॅक्ट लागू केला आहे. त्यामुळे आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे रेल्वे पोलिसांनी देशपांडे यांना नोटीस पाठवून बजावले आहे. मात्र, संदीप देशपांडे उद्या रेल्वेने प्रवास करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.

नोटीस आली तरी आंदोलन हे केलं जाणार, मुंबईत शिवसेनेचा आंदोलनाला परवानगी मिळते. मग मनसेच्या आंदोलनाला नोटीस का? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. आमचं आंदोलन हे सर्वसामान्यांसाठी आहे, गेले अनेक दिवस लोकल सेवा बंद आहे. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. मनसेचे आंदोलन हे होणारच, कंगना विरोधातील आंदोलनाला शिवसेना परवानगी फक्त मनसेच्या आंदोलनाला नोटीस दिली जाते, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

सोमवारी मनसेतर्फे सविनय कायदे भंग करत आम्ही रेल्वे प्रवास करणारसंदीप देशपांडे

लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद आहे. मात्र बससेवा सुरु आहे. पण बसमध्ये प्रचंड हाल होत आहे. जवळपास आठ तास लोकांना घरी जाण्यासाठी लागत आहे. लोकांचे हाल बघवत नाही. वारंवार विनंती करुन सरकार रेल्वे सेवा सुरु करत नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, पालघर या ठिकाणाहून येणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. विनंती करुन सरकार ऐकत नाही. त्यामुळे येत्या सोमवारी मनसेतर्फे सविनय कायदे भंग करत आम्ही रेल्वे प्रवास करणार आहे, असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले.

लोकल सुरु करण्याची वारंवार मागणी

पश्चिम रेल्वेवरील वसई-विरार, नालासोपारा, तर मध्य रेल्वेवरील ठाणे आणि त्यापुढील डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, बदलापूर, कसारा, कर्जत अशा भागात राहणाऱ्या नागरिकांची ऑफिस गाठताना मोठी गैरसोय होत आहे. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्याने कार्यालयात उपस्थिती वाढवली जात आहे, मात्र प्रवासाची साधने नसल्याने बसने येण्या-जाण्यातच दिवसाचा निम्मा वेळ खर्ची पडत असल्याची तक्रार होत आहे.

लोकलमधून प्रवास करण्यास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा असल्याने इतरांना बसशिवाय पर्याय नाही. एकीकडे बेस्ट बसची संख्या प्रशासनाने हळूहळू वाढवली आहे, मात्र लोकलचा भार पेलण्याइतकी ही सेवा सक्षम नसल्याने ताण वाढत आहे. कुठे खचाखच गर्दीने भरलेल्या बसने प्रवास करावा लागतो, अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. तर काही वेळा बस थांबवली जात नसल्याने अनेक तास वाट पाहत राहावी लागते. त्यामुळे लोकल लवकर सुरु करण्याची मागणी वारंवार केली जात आहे.

 

मागे

सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगितीनंतर मराठा समाज आक्रमक, मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन
सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगितीनंतर मराठा समाज आक्रमक, मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पा....

अधिक वाचा

पुढे  

Covishield Vaccine | 'कोविशील्ड' लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या रुग्णालयाला परवानगी
Covishield Vaccine | 'कोविशील्ड' लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या रुग्णालयाला परवानगी

कोरोना प्रतिबंधक लस ‘कोविशील्ड’ची मानवी चाचणी आता नागपुरात होणार आहे. न....

Read more