ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोना काळात पहिल्यांदाच अनारक्षित मेल/एक्सप्रेस विशेष गाड्या धावणार; काय असेल खास?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 17, 2021 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना काळात पहिल्यांदाच अनारक्षित मेल/एक्सप्रेस विशेष गाड्या धावणार; काय असेल खास?

शहर : देश

देशावर कोरोनाचं मोठं संकट ओढावलेलं असून, त्याचा रेल्वे प्रशासनालाही मोठा फटका बसलाय. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली लोकल रेल्वे सेवा आता कुठे सरकारी नोकरदार आणि काही विशेष विभागातील नोकरदारांसाठी उपलब्ध करून दिलीय. कोरोना कालावधीत नियमित गाड्या चालविणे बंद झाले, परंतु प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतलाय. (Railway To 35 Run Unreserved Mail/Express Special Trains)

35 स्थानिक गाड्या अनारक्षित मेल/एक्स्प्रेस विशेष गाड्या म्हणून चालवण्याचा निर्णय

या सेवेत उत्तर रेल्वेने (Northern Railway) 22 फेब्रुवारीपासून 35 स्थानिक गाड्या अनारक्षित मेल/एक्स्प्रेस विशेष गाड्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतलाय. कोरोना संकटात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा प्रवाशांसाठी नोंदणी नसलेली मेल/एक्सप्रेस अशा विशेष गाड्या चालविल्या जात आहेत. म्हणजेच रेल्वेच्या तिकीटघरातून एक्स्प्रेस गाडीची तिकीट घेऊन प्रवासी ट्रेनमध्ये बसू शकतात. पूर्वी चालविल्या जाणार्‍या सर्व विशेष गाड्या पूर्णपणे राखीव ठेवल्या गेल्या आहेत.

प्रवाशांना होत होता त्रास

लोकल गाड्या न धावल्यामुळे ट्रेनमध्ये प्रवास करणार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिल्ली एनसीआरमधील लाखो प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. हापूर, मेरठ, गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, फरीदाबाद, गुडगाव अशा सर्व ठिकाणांहून लाखो प्रवासी या गाड्या वापरून दररोज दिल्लीला येत असतात, परंतु कोरोना असल्याने त्यांना फक्त त्यांच्या वैयक्तिक वाहनानेच रस्त्याच्या मार्गे यावे लागत आहे.

बॅगेज रॅपिंग आणि सेनिटेशन सुविधा

कोविड-१९ या सर्व देशभर पसरलेला साथीच्या आजाराच्या भीतीपासून मुक्तता होण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, नागपूर आणि पुणे स्टेशन येथे अतिनील किरणांद्वारे पॅसेंजरच्या सामान, पार्सलसाठी बॅगेज रॅपिंग आणि सॅनिटायझेशन सुविधा सुरू केलीय.

स्वयंचलित वेंडिंग कियॉस्क

मुंबई, नागपूर आणि पुणे विभागातील विविध स्थानकांवर स्थापित स्वयंचलित वेंडिंग कियॉस्कने मास्क, फेस शिल्ड, हातमोजे, सॅनिटायझरच्या बाटल्या अशा संरक्षणात्मक साधनांची सोय करुन प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.

टीएमए सिस्टम

नागपूर स्थानकात स्थापित स्वयंचलित तिकीट तपासणी व व्यवस्थापकीय प्रवेश प्रणाली कोविड-१९ रोखण्यासाठी प्रवाशाची तिकीट स्थिती शोधण्यासाठी बोर्डिंग प्रोटोकॉल स्वयंचलित अंमलबजावणीद्वारे प्रतिबंधित करते आणि केवळ लक्षणे नसलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यास परवानगी देते.

मागे

…तर लॉकडाऊन करावाच लागेल; राजेश टोपेंच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना
…तर लॉकडाऊन करावाच लागेल; राजेश टोपेंच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या पुन्हा वाढायला लागल्याने प्रशासन ....

अधिक वाचा

पुढे  

OBC Quota Split | ओबीसी आरक्षणाच्या केंद्रीय यादीचे चार वर्ग होणार, न्या.रोहिणी आयोगाची शिफारस
OBC Quota Split | ओबीसी आरक्षणाच्या केंद्रीय यादीचे चार वर्ग होणार, न्या.रोहिणी आयोगाची शिफारस

न्यायमूर्ती रोहिणी आयोगानं दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार ओबीसी प्रवर्गामध....

Read more