By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 07:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भारतीय रेल्वे खासगीकरणाच्या दिशेने नेण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करीत असल्याचे दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणजे यासंबंधी शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी रेल्वे मंत्रालयाने वरिष्ठ अधिकार्यांची बैठक बोलाविली आहे.
राष्ट्रीय ट्रान्सपोर्टने आखलेल्या 100 दिवसांच्या अजेंडयानुसार खासगी कंपन्यांना मुख्य मार्गावर रेल्वे चालविण्यास परवानगी द्द्यावी की नाही, हा निर्णय घेण्यात येणार आहे. आयआरसीटीसीने लखनौ ते नवी दिल्ली आणि मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार्या तेजस एक्सप्रेसच्या दोन ट्रेनचे प्रबंधन करण्याची खासगी कंपन्यांना परवानगी दिली होती.
रेल्वे मंत्रालयाच्या योजनेनुसार लखनौ ते नवी दिल्ली आणि मुंबई अहमदाबाद रेल्वे मार्गावरील प्रंबंधन आरआयसीटीसीकडे देण्यात येणार आहे. तसेच शहरांदरम्यान 14 मार्गावर धावणार्या गाड्यांचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्यात येईल. या योजनेत रात्रभर धावणार्या लांब पल्याच्या आणि चार उपनगरीय गाड्यांचा समावेश आहे.
जोतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्थेची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनाक 29 सप्....
अधिक वाचा