ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

परतीचा पावसाचा धुमाकूळ

By SEJAL PURWAR | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 11:40 AM 2019-02-12T14:15:30+5:30

परतीचा पावसाचा धुमाकूळ

शहर : मुंबई

गेले ५-६ दिवस विश्रांति घेतलेल्या परतीच्या पावसाने काल रात्रीपासून पुन्हा हजेरी लावली. आज पहाटे ४ वाजल्यापासून तर वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करीत मुंबई शहरला चांगलेच झोडपून काढले. त्याच बरोबर मुंबई शहरासह उपनगर, पुणे, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरू आहे. तर नाशिक, लातूर, सातारा, बीड, कोल्हापूर, जिल्ह्यातही पाऊस कोसळत आहे. पावसामुळे विटा-कराड महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पुढील ४-६ तास मुंबई शहर व उपनगर तसेच पालघर, विरार, मीरा-भाईंदर, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, आलिबागच्या भागत पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे. हा परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या काही भागात रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हा परतीचा पाऊस ४-५ ओक्टोंबर पर्यंत आपला गाशा गुंडाळेल, असेही सांगण्यात आले आहे.

 

मागे

खाजगी सुरक्षा क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी भरपूर वाव : अमित शाह
खाजगी सुरक्षा क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी भरपूर वाव : अमित शाह

नवी दिल्लीत खाजगी सुरक्षा यंत्रणांना परवाना देण्याच्या पोर्टलचे उद्‌घाट....

अधिक वाचा

पुढे  

पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल
पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री अमित पवार या....

Read more