ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पूरपरिस्थितीची शक्यता

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 05, 2019 11:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पूरपरिस्थितीची शक्यता

शहर : कोल्हापूर

पुरपरिस्थिती ओसरल्यावर तब्बल 15 दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा पावसाने कोल्हापुर व कोकण सांगली भागात हजेरी लावली आहे. तसेच पुणे सातारा कोकणातही जोरदार पाऊस चालू आहे. कालच्या पावसाने अनेक धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणांचे दरवाजे उघडण्यात आले॰ काही ठिकाणी रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. गणेशोत्सावासाठी गावी गेलेल्या भाविकांची ह्यामुळे गैरसोय झाल्याचे दिसून येत होते. अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. तर काही ठिकाणी ट्रॅफिक जाम व दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत.

कोल्हापूर

कोल्हापुरात भोगावती नदीची दुसर्‍यांदा पाणी पातळी पात्राच्या बाहेर आली आहे. तर जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याकली गेले आहे. राधानगरी,कुंभी, कसारी, तुळशी, दूधगंगा धरण क्षेत्रात पाऊस वाढला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर धरणातून विसर्ग करायला सुरवात केली आहे. राधानगरी धरणातून 7112 क्युसेक, कुंभीमधून 1800 क्युसेक , वारणामधून 8305 तर चिकोत्रा धरणातून 100 कयूसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरू आहे. राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. गगनबावडा येथे दरड कोसळली असल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.

कोकण

महाड, रोहा, नागोठणेसह जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. दरडी कोसळल्या. दिवसभर सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, भोगावती नद्या दुथडी भरून वाहत होत्या. भिसेखिंड येथे दरड कोसळल्याने नागोठणे रोहा दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली. ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने पुणे माणगाव दरम्यानची वाहतूक बाधित झाली. कोकणात जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली.

कोयना धरणातून प्रतिसेकंद ७३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कृष्णा नदीच्या पात्रामधील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन ती २५ फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. राजापूर आणि संगमेश्वरच्या बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला. राजापुरात पुराच्या पाण्यात दोघे जण बुडाले असून, मूर येथे दरड कोसळल्याने पाचलचा संपर्क तुटला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासन सतर्क आहे.

 

मागे

mumbai train updates : हार्बर आणि सेंट्रल रेल्वे पूर्ववत
mumbai train updates : हार्बर आणि सेंट्रल रेल्वे पूर्ववत

काल झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील तिन्ही लाइनच्या लोकल रेल्वे वाहतुक....

अधिक वाचा

पुढे  

चंद्रयान 2 : इतिहास घडवायला भारत सज्ज
चंद्रयान 2 : इतिहास घडवायला भारत सज्ज

जवळ पास दीड महिन्याच्या तपश्चर्येनंतर शनिवारी रात्री 1.30 ते 2.30 च्या दरम्यान भ....

Read more