By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 01:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. तसेच भाजपच्या जाहिराती आणि आश्वासनांची राज ठाकरे पुराव्यासहित पोलखोल करताना दिसत आहेत. राज यांची सोमवारी सोलापुरात जाहीर सभा झाली. त्यावेळी आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हायव्होल्टेच सामना सुरू होता. सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियम गच्च भरले होते. मात्र स्टेडिमवर देखील राज ठाकरेंचा बोलबाला पाहिला मिळाला.
वानखेडे स्टेडियमवर एक प्रेक्षक समोर सामना सुरू असताना मोबाईलवर राज ठाकरे यांचे भाषण पाहात असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे युवकांना आजही क्रिकेट आणि मनोरंजन या व्यतिरिक्त राज ठाकरे मांडत असलेले विचार अधिक पसंतीस उतरत आहेत. सध्या हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जीएसटी, नोटबंदी, तरुणांना नोकर्या, शेतकर्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, शेतकर्यांची कर्जमाफी, असे अनेक आश्वासने सरकारने पूर्ण केले नाही. यावरून राज ठाकरे यांनी सोलापूरमध्ये मोदी सरकारला झोडपून काढले.
बीडच्या सिरसाळातील एका मोकळ्या मैदानात जमिनीखालून लाव्हासद्दश्य पदार्थ ब....
अधिक वाचा