By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2020 10:16 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
राजस्थानच्या बेलगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजस्थानच्या राजसमंद मतदारसंघातील भाजपच्या ज्येष्ठ आमदार किरण माहेश्वरी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हरियाणातील गुरुग्राम याठिकाणच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माहेश्वरी यांच्या अकाली निधनामुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. किरण माहेश्वरी यांना भाजपाच्या कोटा उत्तर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात कोटा महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान माहेश्वरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र काल (29 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली. यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
माहेश्वरी यांच्या निधनानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
“राजस्थानच्या राजसमंद मतदारसंघातील आमदार बहिण किरण माहेश्वरी यांनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवा आणि जनतेच्या हितासाठी वाहिले. त्यांचे अकाली जाणे हे माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.”
“माहेश्वरी यांनी राजकारणासह समाजकारणात विशेष ओळख निर्माण केली. सामाजिक विषयांसह महिला आणि वंचित घटकांसाठी त्या एक सशक्त आवाज होत्या,” असे ट्वीट ओम बिर्ला यांनी केले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या लोटे येथील मालमत्तेच्या लिलावाची संपूर्....
अधिक वाचा