By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2020 07:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून अवाजवी शुल्क आकारण्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. याबाबतचा तपासणी अहवाल तीन दिवसात शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोनाच्या रुग्णांना अवाजवी दरात उपचार मिळण्यासाठी शासनाने 21 मे 2020 रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करुन दिली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार खासगी वाहने आणि रुग्णवाहिकांचे कमाल दर निश्चित केले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करुन देण्याबाबत प्रभावी अमंलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र अद्याप खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याचे तक्रारी आल्या होत्या. याची दखल घेत याबाबत निर्णयांची प्रभावी आणि काटोकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.
भरारी पथकांचे कार्य
वेळोवेळी जाहीर केलेल्या शासन निर्णयाचे खासगी रुग्णालयांकडून पालन होते की नाही याची खातरजमा करणे.
खासगी रुग्णालयांमध्ये अधिसूचना आणि अधिसूचित दर दर्शनी भागावर लावले की नाही याची पाहणी करणे.
खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी बिले अंतिम करण्यापूर्वी त्याच्या तपासणीसाठी यंत्रणा नेमावी.
आकारलेले दर, खासगी वाहने, रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर योग्य आहेत की नाही याची तपासणी करावी.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांनी दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे, या बाबींची तपासणी करावी
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे....
अधिक वाचा