By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 26, 2020 02:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अमरावती
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाड्यांचा ताफा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. अमरावती जिल्ह्यातील वाढते कोरोना रुग्ण, वाढीव बिलं, बेडची कमतरता आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभारामुळे भाजप युवा मोर्चाने अशाप्रकारे आंदोलन केलं. त्यामुळे राजेश टोपेंना रस्त्यात गाडी थांबवत त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागलं.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष प्रणित सोनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य शासनाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून कोरोना काळात उपाययोजना झाल्या पाहिजे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून भोंगळ कारभार लवकरात लवकर बंद व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्या तर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष प्रणित सोनी यांनी दिला.
दरम्यान राजेश टोपे यांनी अमरावती जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर,औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे,स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
राज्यात काल 17 हजार 794 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे नवीन 19 हजार 592 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 9 लाख 92 हजार 806 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2 लाख 72 हजार 775 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 76.33 टक्के झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अ�....
अधिक वाचा