By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2019 02:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
संरक्षण क्षेत्रात सार्वजनिक उपक्रमाना आणि आयुध निर्माण कारखाना मंडळाला बळकट करतानाच या क्षेत्रात खाजगी उद्योगांच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची सरकारची इच्छा आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
'मेक इन इंडिया इन डीफेन्सं इंडस्ट्री' या विषयावर आघाडीच्या संरक्षण सामुग्री उत्पादक कंपन्या आणि हवाई सामुग्री क्षेत्रातील कंपन्याच्या मुख्यकार्यकारी अधिकार्यांची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना संरक्षण मंत्री सिंह पुढे म्हणाले की, निर्यात व्यतिरिक्त स्थानिक बाजारपेठेत योगदान देण्यासाठी संरक्षण सामुग्री उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. संरक्षण उत्पादक विषयक पायाभूत सुविधा आणि पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी संरक्षण विषयक भागीदारीचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. त्यामधून भारतीय कंपन्यांना आपल्या भागीदाराची निवड स्पर्धात्मक आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे करता येईल, अशी माहितीही संरक्षण मंत्र्यांनी दिली.
कोल्हापूर, सांगली तिल पूरग्रस्ताना मदत करण्यासाठी अनेक संस्था, व्यक्ति पुढ....
अधिक वाचा