ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या, मरण येणारच असेल तर सोशल डिस्टन्स कशाला : राजू शेट्टी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 21, 2020 11:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या, मरण येणारच असेल तर सोशल डिस्टन्स कशाला : राजू शेट्टी

शहर : कोल्हापूर

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोसळलेल्या दुधाच्या दरांचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक शेतकरी संघटनांनी दूध दरवाढीसाठी तीव्र आंदोलन छेडलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील कोल्हापूरमध्ये शंकर भगवानाला दुग्धाभिषेक करुन केंद्र सरकारला सुबुद्धी देण्याचं साकडं घातलं (Raju Shetti comment on Milk Agitation). तसेच अमृतासारखं दूध जमिनीवर ओतून देताना होणारा त्रास समजून घ्या. 30 ते 35 रुपये उत्पादन खर्च असणाऱ्या दुधाला पाण्यापेक्षाही कमी किंमत मिळत आहे, असं मत व्यक्त केलं. तसेच मरण येणारच असेल, तर सोशल डिस्टन्स कशाला? असा सवालही त्यांनी केला.

राजू शेट्टी म्हणाले, “शेतकऱ्यांना प्रतिलीटर दुधाला 30 ते 35 रुपये उत्पादन खर्च येतो. आज पिण्याच्या पाण्यालाही प्रतिलीटर 20 रुपये मिळतात. मात्र, दुधाला 17-18 रुपये दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. त्यामुळे अमृतासारखं दूध जमिनीवर ओतून देताना होणारा त्रास लक्षात घ्या. कर्जबाजारी होऊन मरण येणार असेल, तर सोशल डिस्टन्सिंग कशाला?”

पाण्यापेक्षा या अमृताला कमी भाव दिला जातोय. आमच्या आया-बहिणी राबराब राबतात. शेणामुतात हात घालून काम करतात. त्या माऊलींच्या भावनांची किंमत नाही का? बाटलीबंद पाण्याला 20 रुपये आणि दुधाला 17 रुपये दर मिळतोय. मग आंदोलकांनी दूध ओतलं तर त्याला नासाडी का म्हणायचं? हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. श्रावणाच्या पहिल्या दिवशी पवित्र मनाने आंदोलन हाती घेतोय. शेतकऱ्यांना न्याय मिळेल ही आशा आहे,” असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

शंकर भगवानाला दुग्धाभिषेक करुन राज्य आणि केंद्र सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे घातले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्याला केवळ 17-18 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे रस्त्यावर दूध ओतताना शेतकऱ्यांना होणारा त्रास समजून घ्या, असंही आवाहन राजू शेट्टी यांनी केलं.

आजचं आंदोलन प्रातिनिधिक स्वरुपातील आहे. येत्या 8-10 दिवसांमध्ये दूध दरवाढीवर निर्णय झाला नाही, तर पुढचं आंदोलन मर्यादा ओलांडणारं असेल. पुढचं आंदोलन स्वाभिमानी स्टाईलने असेल, असाही इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. तसेच मरण येणारच असेल, तर सोशल डिस्ट्स्न ठेऊन तरी काय उपयोग? असा सवाल केला.

 

मागे

MCA कडे मुंबई पोलिसांची कोट्यवधींची थकबाकी
MCA कडे मुंबई पोलिसांची कोट्यवधींची थकबाकी

मुंबई पोलिसांकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सामन्यांसाठी सुरक्....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई महापालिकेची नऊ रुग्णालये पुन्हा 'नॉन कोव्हिड', साथीच्या आजारांवर उपचार होणार
मुंबई महापालिकेची नऊ रुग्णालये पुन्हा 'नॉन कोव्हिड', साथीच्या आजारांवर उपचार होणार

पावसाळ्यात साथीच्या आजारांवरही उपचार व्हावेत, यासाठी मुंबई महापालिकेने न....

Read more