By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 22, 2020 12:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
राज्यसभेत शेतकऱ्यांशी संबंधित विधेयकाविरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांच्या आंदोलनामुळे वातावरण तापलं आहे. 20 सप्टेंबर रोजी कृषी विधेयकं मंजूर होण्याच्या वेळी विरोधी खासदारांनी घातलेल्या गोंधळाचा निषेध म्हणून राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह 24 तासांचं उपोषण करणार आहेत. हरिवंश यांनी पत्राद्वारे राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांना याबाबत माहिती दिली आहे.
उपसभापती हरिवंश यांचं एक दिवसाचं उपोषण
पत्रात उपसभापतींनी लिहिलं आहे की, "20 सप्टेंबर रोजी वरिष्ठ सभागृहाचं जे चित्र होतं, ते पाहून सभागृहाच्या मर्यादेचं उल्लंघन झालं. लोकशाहीच्या नावावर हिंसक वर्तन झालं. आसनावर बसलेल्या व्यक्तीला घाबरवण्याचा प्रयत्न झालं. नियम पुस्तिका फाडण्यात आली. दोन दिवसांपासून मी अतिशय तणावात आणि मानसिक वेदनेत आहे. संपूर्ण रात्र मी झोपू शकलो नाही. माझ्यासोबत झालेल्या अपमानास्पद वर्तनाबाबत एक दिवसाचा उपवास ठेवावा, असं मला वाटतं. कदाचित यामुळे खासदारांमध्ये आत्मशुद्धीची भावना जागृत होईल."
खासदारांना चहा घेऊन उपसभापती आंदोलक खासदारांच्या भेटीला
राज्यसभेतून निलंबित झालेले आठही खासदार रात्रीपासून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत आहेत. सभागृहात गोंधळ घालून उपसभापतींसोबत गैरवर्तन केल्याने राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी रविवारी आठ खासदारांचं निलंबन केलं. त्यानंतर सोमवारी दुपारपासून खासदारांनी आंदोलनाला सुरुवात केली. आज सकाळी आठ वाजता उपसभापती हरिवंश यांनी या खासदारांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत एक पिशवी होती, ज्यात खासदारांसाठी चहा आणला होता. हरिवंश यांनी स्वत: सगळ्या खासदारांना चहा दिला, परंतु विरोधी खासदारांनी चहा घेण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी खासदारांशी संवादही साधला.
#WATCH: Rajya Sabha Deputy Chairman Harivansh brings tea for the Rajya Sabha MPs who are protesting at Parliament premises against their suspension from the House. #Delhi pic.twitter.com/eF1I5pVbsw
— ANI (@ANI) September 22, 2020
पंतप्रधानांकडून उपसभापतींचं कौतुक
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिवंश यांच्या या कृत्याचं कौतुक केलं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ज्या खासदारांनी हल्ला केला, अपमान केला आणि आता आंदोलन करत आहे, त्या खासदारांसाठीच हरिवंश चहा घेऊन पोहोचले. यामधून त्यांचं मोठं मन दिसतं. त्यांची महानता दिसते. संपूर्ण देशासह मीही त्यांना शुभेच्छा देतो."
To personally serve tea to those who attacked and insulted him a few days ago as well as those sitting on Dharna shows that Shri Harivansh Ji has been blessed with a humble mind and a big heart. It shows his greatness. I join the people of India in congratulating Harivansh Ji.
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2020
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सु....
अधिक वाचा