ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राम जन्मभुमी केस: हिंदूंची सुनावणी झाली पूर्ण, लवकरच येणार निर्णय

By SEJAL PURWAR | प्रकाशित: ऑगस्ट 31, 2019 01:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राम जन्मभुमी केस: हिंदूंची सुनावणी झाली पूर्ण, लवकरच येणार निर्णय

शहर : delhi

गेल्या 70 वर्षांपासून चालू असलेल्या वादाला कुठेतरी शांतता प्राप्त होण्याची शक्यता दिसून येत आहे. देशातील सर्वात जास्त संवेदनशील असलेल्या अयोध्या रामजन्मभूमी व बाबरी मस्जिद खटल्यावरील हिंदूंची सुनावणी आज संपली. आता येत्या सोमवारपासून मुस्लिम बांधवांची सुनावणी सुरू होणार आहे. यावरून या खटल्यावरील निर्णय नोव्हेंबर महिन्यापर्यंत येण्याची शक्यता वाटत आहे. अयोध्येतील 2.77 एकर जागेच्या हक्कावरून 70 वर्षांपासून ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.

 

6 ऑगस्टपासून या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती, अवघ्या 25 दिवसानंतर हिंदू पक्षाची सुनावणी पूर्ण झाली व आता लवकरच या प्रकरणाचा अंतिम निर्णय लागण्याची शक्यता आहे. या आधी अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल देताना 2.77 एकर जमिनीतील दोन तृतीयांश जमिनीचा वाटा हिंदुपक्षाला दिला होता परंतु यातही वकिलांनी त्यांची वेगवेगळी मते मांडली.

 

यावेळी देखील खटल्याची सलग सुनावणी सुरूच होती, परंतु वरिष्ठ वकिलांनी व्यक्तिवादास पुरेसा वेळ मिळणार नाही, असे सांगत नियमित सुनावणीस विरोध केला होता. परंतु न्यायालयाने त्यांच्या विरोधाची अंमलबजावणी केली नाही व नियमित सुनावणी चालूच ठेवली. बाबरी मस्जिद व रामजन्मभूमी (अयोध्या) हा मुद्दा अत्यंत संवेदनशील असल्याने बाहेर देखील अनेक वादविवाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे समोर येते, कदाचित यामुळेसुदधा निर्णय घ्यायला अडचण येत असल्याने निकाल लांबवला जात असू शकतो. परंतु आता अंतिम सुनावणी लवकरच सुरू होत असल्याने हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षधारकांना लवकरात लवकर निर्णयाची अपेक्षा असल्याचे दिसून येत आहे.

 

मागे

सरकारी कार्यालयात जीन्स आणि टी-शर्टवर बंदी
सरकारी कार्यालयात जीन्स आणि टी-शर्टवर बंदी

शासकीय अधिकारी यांनी जीन्स आणि टी-शर्ट न घालता फॉर्मल ड्रेसवरच कार्यालयात ....

अधिक वाचा

पुढे  

देशभरात वाहतुकीचे नवीन नियम होणार कार्यरत
देशभरात वाहतुकीचे नवीन नियम होणार कार्यरत

 बर्‍याच दिवसांपासून वाहतुकीचे नवीन नियम व दंड आकारण्याचे कायदे निर्माण....

Read more