By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 07, 2021 02:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) विरोधात अवैध बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने (BMC) जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी मुंबई महापालिकेच्या निर्णयावर टीका केली आहे. कंगना रणौत नंतर सोनू सूद यांच्यावर वेळ आली असून किती जणांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार, असा सवाल राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. राम कदमांनी त्याबाबत ट्विट केले आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी यापूर्वी कंगना रणौतच्या बाजूनं मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली होती. मुंबई महापालिकेने अभिनेता सोनू सदू विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर राम कदमांनी त्याच्या बाजूनं भूमिका मांडली आहे. कोरोना संकटाच्या काळात सोनू सूद यांनी गरीब मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मदत केली. हे काम महाविकास आघा़डी सरकारनं करायलं हवं होतं. मात्र, ही गोष्ट सरकारला आवडली नाही,त्यामुळे बदल्याच्या भावनेतून कंगना रणौत आणि आता सोनू सूद यांच्याविरोधात कारवाई करण्यात येतीय, असं राम कदम म्हणाले. महाविकास आघाडी सरकार किती जणांचे आवाज दाबणर असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.
#corona के संकट काल में actor @SonuSood जी ने खुद के पैसों से गरीब मजदूरों को उनके गाँव भेजने में सहायता की थी. हालाकी यह काम #MVA महाराष्ट्र सरकार का था. उन्हें यह बात रास नहीं आयी. क्या
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) January 7, 2021
उसी वज़ह से बदले के भाव में @KanganaTeam के बाद अब @SonuSood की बारी?
सोनू सूद यांच्या विरोधात मुंबई महापालिकेची तक्रार
प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जुहू पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबई महापालिकेने जुहू पोलिसांकडे तक्रार करुन सोनू सूद विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायद्यांतर्गत सूदने केलेल्या अनियमित भरती, बदल आणि उपयोगकर्त्याच्या बदल्याची नोंद घेण्यासंदर्भात जुहू पोलिसांना सांगण्यात आले आहे. पालिकेने सोनू सूद विरोधात 4 जानेवारील तक्रार दाखल केली आहे. सहा मजली इमारत परवानगी न घेता हॉटेलमध्ये रुपांतरित केल्याची पालिकेची तक्रार आहे. सोनू सूदला याबाबत नोटीस देऊन सुद्धा बांधकाम सुरूच ठेवले त्यामुळे पालिकेने पोलिसात तक्रार केलीय.
जुहू येथील एबी नायर रोडवरील शक्ती सागर बिल्डींगचे रुपांतर आवश्यक त्या परवानग्या न घेता रुपातंर केल्यामुळे पालिकेने पोलीस ठाण्यात सूद विरोधात तक्रार केली आहे.
सोनू सूद यांची भूमिका
याप्रकरणी सोनू सूदने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आधीच बीएमसीकडून युझर चेंजसाठी परवानगी घेतलेली आहे. सध्या ते महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची महाराष्ट्र पोलीस महासंचाल....
अधिक वाचा