ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पोलिसांचा दुरुपयोग करत महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी, भाजपचा गंभीर आरोप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 04, 2020 09:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पोलिसांचा दुरुपयोग करत महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी, भाजपचा गंभीर आरोप

शहर : मुंबई

रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपने महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. पोलिसांचा दुरुपयोग करुन महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी लावल्याचा आरोप भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केला आहे. गेल्या काही महिन्यात रिपल्बिक टीव्हीने कोरोनाबाबत राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची पोलखोल केली. त्यामुळेच राज्य सरकार पोलिसांच्या माध्यमातून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राम कदम यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसात ज्या प्रकारे अर्णव गोस्वामी आणि त्यांचं चॅनेल रिपब्लिक टीव्ही ने महाराष्ट्र सरकारच्या अनेक गोष्टींवर हल्ला चढवला होता, तो पालघर हत्यांकांड असो किंवा सुशांत सिंह राजपूत आत्यहत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारचा हस्तक्षेप असेल.  या सर्व गोष्टी देशापासून आणि जनतेपासून लपलेल्या नाहीत, कुठेतरी बदला आणि सुडाच्या भावनेतून महाराष्ट्र सरकारने पोलिसांचा दुरुपयोग करत केलेलं अतिशय निंदनीय कृत्य आहे. सरकारला अशाप्रकारे पोलीस बळाचा वापर करता येणार नाही, कोरोनाशी दोन हात करताना आलेलं अपयश आणि सर्वच विषयांत सरकारला आलेलं अपयश ते रिपब्लिकच्या पत्रकारांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला, दिखावेगिरी करत सरकारने अशा प्रकार खोटंनाटं करुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला हे दुर्दैवी, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राम कदम यांनी अर्णव गोस्वामीच्या अटकेनंतर दिली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सकाळी अटक केली. गोस्वामी यांच्या निवासस्थानावरुन रायगड पोलिसांनी गोस्वामी यांना अटक केली आहे. त्यानंतर जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे.

किशोर पेडणेकर यांचा भाजपवर पलटवार

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप आमदार राम कदम यांचा आरोप फेटाळून लावला आहे. अन्वय नाईकची आत्महत्या भाजप सरकारच्या काळात झाली. त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार केली. पण भाजप सरकारनं हे प्रकरण दाबण्याचा प्रत्यारोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

काय आहे अर्णव गोस्वामी अटक प्रकरण?

मुंबईतील इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले होते. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाउसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करत होती. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वय यांनी मागितले होते. मात्र, अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा ते देण्यास टाळाटाळ करत होते. तर दुसरीकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु समोरून पैसे येत नसल्याने अन्वय यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.

मागे

'टीआरपी वाढवण्यासाठी ‘रिपब्लिक’कडून घेतले १ कोटी'
'टीआरपी वाढवण्यासाठी ‘रिपब्लिक’कडून घेतले १ कोटी'

टीआरपी घोटाळ्या प्रकरणी ‘रिपब्लिक’वाहिनीसमोरील अडचणींमध्ये वाढ होतान....

अधिक वाचा

पुढे  

अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्र सरकारची कारवाई आणीबाणीसारखी
अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्र सरकारची कारवाई आणीबाणीसारखी

रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर केंद्र सरकारची पहिली....

Read more