By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 21, 2019 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
रेल्वे प्रशासनाने यावर्षीही 3 नोव्हेबरपासून रामायण एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळी भाविकाना यावर्षीही जाण्याची संधी मिळणार आहे. ही एक्सप्रेस दिल्लीच्या सफदरजंग स्थांनकावरून रवाना होत. 16 दिवसांमध्ये भारत आणि श्रीलंकेचा प्रवास पूर्ण करणार आहे. यात 800 भाविकच सहभागी होऊ शकतील. यातील 40 भाविकांनाच श्रीलंकेपर्यंतचा प्रवास करता येणार आहे.
भारतात ही रेल्वे अयोध्या, नंदिग्राम , जनकपुर , वाराणसी, प्रयाग राज , शृंगवेरपूर , चित्रकूट, नाशिक, हम्पी, आणि रामेश्वर चे दर्शन घडविणार आहे. श्रीलंके पर्यंत जाणारे भाविक कोलंबो, कंडी कुवरा, एलियाचे दर्शन घेऊ शकतील. एक्स्प्रेसचा प्रवास 2 टप्प्यांमध्ये होईल. यात्रेच्या श्रीलंकेच्या हिस्साचे शुल्क वेगळे असणार आहे. या प्रवासात भारतातून श्रीलंकेकरिता विमानसेवा उपलब्ध केली जाणार आहे.
गेल्या वर्षी 14 नोव्हेबर रोजी दिल्ली तर 22 नोव्हेंबर रोजी जयपुर येथून ही रेल्वेसेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी भारतात दर्शन घेणार्या भाविकांसाठी 15120 रुपये प्रवास भाडे निश्चित करण्यात आले होते. तर श्रीलंका प्रवासाकरिता 36970 रुपयांचे शुल्क आकारण्यात आले होते. यावर्षीही यात्रेवर तेवढाच खर्च अपेक्षित आहे. यात्रा व्यवस्थापक भाविकाना प्रत्येक तीर्थस्थळांचा तपशील सांगणार आहेत.
विरार पश्चिम येथील ए बी इस्टेट परिसरात तनीष महाडिक या 11 वर्षाच्या मुलगाने अ....
अधिक वाचा