By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 13, 2020 01:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याने शिवसैनिकांनी मारहाण केलेले निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी भेट घेतली. “उद्धव ठाकरे यांना सरकार चालवता येत नसेल, तर त्यांनी राजीनामा दिला पाहीजे. राष्ट्रपती राजवट लागू केली पाहीजे” अशी मागणी यावेळी मदन शर्मा यांनी केली.
“मी पोस्ट फॉरवर्ड केली होती, पण उदय महेश्वरी यांनी चित्र काढलं आहे. त्यांना पकडायचं सोडून मला पकडले, ही त्यांची क्रिएटीव्हीटी” असं मदन शर्मा म्हणाले. “मला चार वेळा फोन आला. काही शिवसैनिकांनी बातचीत करण्यासाठी बोलवले, मी गेलो, पण मला मारहाण सुरु झाली” असे त्यांनी सांगितले.
I request Chief Minister Uddhav Thackeray ji that if you cannot run the government, then you should resign. Let people elect a government that can maintain law and order in Maharashtra: Madan Sharma, retired Navy officer who alleged he was beaten up by Shiv Sena workers in Mumbai https://t.co/sNoSt2x6Zy pic.twitter.com/4E7OabQrrj
— ANI (@ANI) September 13, 2020
“संपूर्ण देश म्हणतोय हे सरकार बदलले पाहिजे. जर उद्धव ठाकरे यांना सरकार चालवता येत नसेल, तर त्यांनी राजीनामा दिला पाहीजे. राष्ट्रपती राजवट लागू केली पाहीजे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणारे सरकार लोकांना निवडू द्या” अशी मागणी मदन शर्मा यांनी केली.
‘पोलिसांवर दबाव होता, त्यामुळे हे सगळे सुटले. मला सुरक्षा मिळाली आहे, एक अधिकारी आणि दोन कर्मचारी. पण हत्येच्या प्रयत्नाची केस झाली पाहिजे अशी मागणी शर्मा यांनी केली.
“सरकारने दबाव आणून या सर्वांना सोडवले. किमान 15-20 दिवस आरोपी आतमध्ये पाहिजे होते. हा एक फोटो आहे, कार्टून नाही. राज्यात गढूळ वातावरण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे” ही मदन शर्मा यांची मागणी आठवलेंनीही उचलून धरली.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या केस मध्ये पोलिसांना अपयश आले आहे, असेही आठवले म्हणाले. तर जो इथे राहतो, त्याची मुंबई, मुंबई सर्वांची आहे, असे म्हणत संजय राऊत यांना टोला लगावला.
“एका बाजूला शरद पवार यांचा ब्रॅंड, उद्धव ठाकरे पण ब्रॅंड आहेत, राज ठाकरे ब्रॅंड आहेत आणि मी सुद्धा ब्रॅंड आहे” अशी मिश्कील प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांना मांडलेल्या भूमिकेवर दिली.
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी 65 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवार 11 सप्टेंबरला समोर आला होता. या प्रकरणी अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. आरोपींमध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम यांचाही समावेश आहे.
कांदिवलीतील समतानगरमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. मारहाणीत मदन शर्मा यांच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मदन काशिनाथ शर्मा यांनी त्यांच्याकडील ‘महानगर -1’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर राजकीय पुढार्यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र फॉरवर्ड केले. या कारणावरुन कमलेश कदम आणि इतर आठ ते दहा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीला मारहाण करत डोळ्याला दुखापत केली म्हणून समतानगर पोलीस ठाणे येथे कलम 325, 143, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. शनिवारी सकाळी कोर्टात हजर केले असता सहाही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला.
कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. ही ....
अधिक वाचा