By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 15, 2019 11:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केले. त्यावेळेस संबोधताना त्यांनी सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिंनांनिमित शुभेच्छा दिल्या आणि देशातील चालू घडामोडींवर प्रकाश टाकत देश सर्वार्थाने प्रगतीकडे जात असल्याबद्दल सांगून देशवासियांकडून अशीच सहकार्याची अपेक्षा केली. देशात अनेक जुने नियम, कायदे बदलून नवीन समाज निर्मितीचा जो प्रयत्न होत आहे. त्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्याच सोबत तीन तलाक पद्धतीच्या कायदयाबद्दलही त्यांनी होणार्या बदलामुळे महिलाना भयमुक्त जीवन जगण्याची नवी संधी मिळाल्याचे संगितले. कलम 370 रद्द झाल्यामुळे काश्मीरला आता प्रगतीच्या दिशेने जाण्यात मोठा लाभ होईल. असे सांगून इतरही अनेक मुद्द्यांवर संबोधित केले.
राष्ट्रपतींच्या भाषणाचा संपादित अंश :
1. 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
2. स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या, त्याग आणि बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीकारकांचे आम्ही कृतज्ञतेने स्मरण करतो.
3. काही आठवड्यातच 2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आपण साजरी करणार आहोत. गांधीजी आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आणि सामाजिक विषमता दूर करण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मार्गदर्शकही होते.
4. महात्मा गांधीजींच्या कार्यकाळातला भारत आणि आजचा भारत यातली परिस्थिती वेगळी असली तरीही, गांधीजींचे मार्गदर्शन आजही समर्पक आहे.
5. नैसर्गिक संसाधनांचा वापर विवेकाने केला तरच विकास आणि निसर्ग यांचा समतोल राखला जाईल, असं गांधीजी म्हणत. पर्यावरणाप्रती संवेदनशीलतेवर त्यांचा भर होता. निसर्गाशी मेळ राखत जगण्याची शिकवण त्यांनी दिली.
6. आपल्या वंचित बांधवांसाठी कल्याणकारी योजना आखताना, सौर उर्जेचा नविकरणीय उर्जा म्हणून उपयोग करताना, गांधीजींचे हेच तत्व आपण आचरणात आणत आहोत.
7. शीख धर्माचे संस्थापक म्हणून गुरु नानक देव यांच्या प्रती, लोकांच्या मनात असलेला आदरभाव केवळ शीख बंधू-भगिनींपुरताच मर्यादित नाही, तर भारत आणि जगभरातल्या करोडो लोकांपर्यंत व्यापक आहे. गुरु नानक देव यांच्या सर्व अनुयायांना 550 व्या पवित्र जयंती वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
8. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंबाचं जीवन आणि संपूर्ण समाज व्यवस्था उत्तम करणे हा क्रांतिकार्य करणार्या पिढीचा उद्देश होता.
9. जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी जे नुकतेच बदल करण्यात आले त्यामुळे इथल्या रहिवाशांना त्याचा मोठा लाभ होईल असा मला विश्वास आहे. त्यांनाही देशाच्या इतर भागातल्या नागरिकांना मिळणाऱ्या सर्व अधिकार आणि सुविधांचा लाभ घेता येईल. समानतेला प्रोत्साहन देणारे प्रगतीशील कायदे आणि तरतुदींचा उपयोग त्यांना करता येईल.
10. शिक्षणाचा अधिकार’ कायदा लागू झाल्यानं सर्व बालकांना शिक्षण सुनिश्चित होईल. माहितीचा अधिकार प्राप्त झाल्याने जनहिताशी संबंधित माहिती इथल्या लोकांना मिळू शकेल, पारंपरिक रूपाने वंचित राहिलेल्या वर्गासाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण आणि इतर सुविधा मिळू शकतील.
11. तिहेरी तलाक सारख्या प्रथा नष्ट झाल्याने महिलांना न्याय मिळेल आणि भयमुक्त जीवन जगण्याची संधी मिळेल.
12. यावर्षीच्या उन्हाळ्यात आपण सर्व देशवासीयांनी 17 व्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होऊन जगातली सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया संपन्न केली. यासाठी सर्व मतदारांचे मी अभिनंदन करतो.
13. प्रत्येक निवडणुकीत विकासाच्या प्रवासातल्या एका नव्या अध्यायाचा प्रारंभ होतो. निवडणुकीच्या माध्यमातून, आपले देशवासीय आशा आणि विश्वास नव्यानं व्यक्त करतात. आपल्या गौरवशाली देशाला नव्या शिखरावर नेण्यासाठी प्रत्येकाने खांद्याला खांदा भिडवून एकत्र काम करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
14. संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात, आशयघन चर्चा आणि राजकीय पक्षांच्या परस्पर सहयोगाने अनेक महत्वाची विधेयकं मंजूर झाली. ही चांगली सुरवात आहे.. राज्यांच्या विधानसभांनीही संसदेची ही प्रभावी कार्य संस्कृती बाणवावी असं आवाहन मी करतो.
15. लोकशाही दृढ करण्यासाठी संसद आणि विधानसभांनी आदर्श कामकाजाचं उदाहरण घालून दिलं पाहिजे.
16. मतदार आणि लोक प्रतिनिधी, नागरिक आणि सरकार, समाज आणि प्रशासन यांच्यातल्या आदर्श भागीदारीतून राष्ट्र निर्माणाचे आपले अभियान अधिक बळकट होईल.
17. 1947 च्या पूर्वी सर्व भारतीयांचे लक्ष्य होते ते स्वातंत्र्य प्राप्तीचं. आज आपले लक्ष्य आहे ते विकासाची गती वाढवण्याचे, प्रभावी आणि पारदर्शी प्रशासनाचे, ज्यामुळे जनतेचे जीवन अधिक सुकर होईल.
18. देशात कुठे पूर तर कुठे दुष्काळ या समस्यांवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी, जलशक्तीच्या सदुपयोगावर विशेष भर दिला जात आहे. जल सुरक्षा सुनिश्चित करण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकाराबरोबरच आपणा देशवासीयांची महत्वपूर्ण भूमिका राहील.
19. देशाच्या सर्व भागात दळण वळणाच्या अधिकच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. यासाठी गावं रस्तामार्गे जोडली जात आहेत आणि उत्तम महामार्ग बांधण्यात येत आहेत.रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुविधापूर्ण करण्यात येत आहे. मेट्रो रेल्वे द्वारे,शहरातल्या लोकांचा प्रवास सुलभ करण्यात येत आहे. छोटी शहरेही हवाई मार्गाने जोडण्यात येत आहेत. नवी बंदरं निर्माण करण्यात येत आहेत. त्याचबरोबर, रुग्णालयं, शिक्षण संस्था, विमानतळ, रेल्वे स्थानकं, बस स्थानकं, आणि बंदरे आधुनिक करण्यात येत आहेत. जनतेच्या हितासाठी, बँकिग सुविधा अधिक पारदर्शी आणि समावेशक करण्यात येत आहेत. उद्योजकांसाठी, कर प्रणाली आणि निधी उपलब्धता सुलभ करण्यात आली आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून, सरकार, लोकांपर्यंत, नागरी सुविधा आणि उपयुक्त माहिती पोहोचवत आहे.
20. सरकार, मोठ्या प्रमाणात, आरोग्य सुविधा प्रदान करत आहे. दिव्यांग जनांना, मुख्य प्रवाहाशी जोडण्याकरिता, त्यांना विशेष सुविधा देण्यात येत आहेत.
21. महिला सबलीकरणासाठी, सरकारनं,कायदा आणि न्याय व्यवस्थेमध्ये आवश्यक सुधारणा केल्या आहेत.देशवासीयांचं जीवन सुलभ करण्यासाठी, कालबाह्य कायदे रद्द करण्यात आले आहेत.
22.. राष्ट्रीय संपत्तीच्या रक्षणाची सांगड स्वातंत्र्य रक्षणाशी आहे.
23. भारतीय समाज नेहमीच, शांत, सरळ आणि ’जगा आणि जगू द्या’ या तत्वाला अनुसरत आला आहे. भाषा, पंथ, प्रांत याचा भेदभाव न करता आपण परस्परांचा आदर करत आलो आहोत. हजारो वर्षांच्या इतिहासात, भारतीय समाज, दुर्भावनेनं अथवा पूर्वग्रहानं वागल्याचं उदाहरण दुर्मिळच आढळेल. सलोख्यानं, एकोप्यानं, बंधुभावानं राहणे,सदैव सुधारणा आणि समन्वयावर भर देणे, हा आपल्या वारसा आणि इतिहासाचा भाग आहे. आपलं भविष्य घडवण्यात याची प्रमुख भूमिका आहे. दुसऱ्याचे चांगले विचार आपलेसे करून आपण आपल्या उदारतेची नेहमीच प्रचीती दिली आहे.
24. आपला देश हा युवकांचा देश आहे. युवकांच्या या उर्जेला योग्य दिशा देण्यासाठी, देशातल्या विद्यालयात, जिज्ञासा जागृत करण्यासाठी पोषक वातावरणाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
25. समाजातल्या दुर्बल घटकाप्रती आपली संवेदनशीलता भारत सदैव जपेल आपली प्राचीन मूल्य, आपले आदर्श कायम राखेल आणि शौर्याची परंपरा सुरु ठेवेल याचा मला विश्वास आहे.
26. ज्ञान आणि विज्ञानाच्या बळावर चंद्र आणि मंगळावर पोहोचण्याचे सामर्थ्य आपण भारतीय बाळगून आहोत. निसर्ग आणि जीवसृष्टी साठी प्रेम आणि करुणेचा भाव, हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. जगातल्या तीन चतुर्थांश वाघांसाठी आपण सुरक्षित आश्रय स्थान पुरवलं आहे.
आपल्या स्वातंत्र्य चळवळीला स्वर देणारे थोर कवी, सुब्रम्हण्य भारती यांनी शंभर वर्षापूर्वी भावी भारताचं जे कल्पनाचित्र रेखाटलं होते ते आज आपल्या प्रयत्नातून वास्तवात साकार होताना दिसत आहे.त्यांनी म्हटलं होते:
आम्ही शास्त्र आणि विज्ञान दोन्ही आत्मसात करू,
आम्ही आकाश आणि महासागर दोन्हींचा ठाव घेऊ,
आम्ही चंद्राच्या रहस्याची उकल करू,
आम्ही आपले मार्गही स्वच्छ राखू,
उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्र राज्....
अधिक वाचा