By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 07:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
कोल्हापूरच्या ओंकार नवलिहाळकर आणि नाशिकचा विनीत मालपुरे या दोघांचा राजधानी दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तर संस्था विभागातून चंद्रपूरच्या इको प्रो या बहुउद्देशीय संस्थेचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी देशातील 20 तरुण आणि तीन संस्थांना केंद्रिय युवक कल्याणमंत्री किरेन रिजूजी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. ओमकार नवलिहाळकरवर कोल्हापुरातील आपत्कालीन सेवा संस्थांच्या माध्यमातून समाजसेवी उपक्रमांमध्ये बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे. जीवनज्योत आपत्कालीन सेवा संस्था, जीवनज्योत मुक्ती आपत्कालीन सेवा संस्थेबरोबर काम करीत असताना आणि त्याने अनेकांचे प्राण वाचविले आहेत. सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर मधील शाळा तंबाखूमुक्त करणे व कार्य महत्त्वाचे योगदान दिले आहे. नाशिकचा विनीत मालपुरे यांचे युवा विकास कार्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रकुल युवा स्पर्धा यामध्ये सहभाग घेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून युवा विकासाचे कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचवले आहे
स्वच्छ सर्वेक्षण 2020 चे उद्घाटन केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्....
अधिक वाचा