By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2019 04:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मधील चिवेळी येथे डोंगर खचला, तिवरे येथील डोंगराचा काही भाग खचला, संगमेश्वरातील नीवे बुद्रुक गावात धरणाच्या बाजूचा डोंगर खचला, रत्नागिरीत मिजोळे येथे जमीन खचली, संगमेश्वराच्या फुंगूस गावात धुळवाडी, येथील जमिनीला भेगा पडल्या, चिपळूण तालुक्यात नांदीवसे आणि कोळकेवाडीतील लंबेवाडीत डोंगर तडे जावून खचला रत्नागिरीत शिळ धरणाच्या डाव्या बाजूला भेगा पडल्याने ग्रामस्थामध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
त्याचप्रमाणे रत्नागिरीतील भडवळे , देवूलवाडी ते शिंदेवाडी जमिनीला मोठ्या प्रमाणावर तडा गेल्याने तेथील घरांना धोका निर्माण झाला आहे. संगमेश्वर मधील कोळंबे गावात डोंगराला भेगा पडल्याने वाडीला धोका निर्माण झाला आहे. साखरपा येथील पुरयेतील धंनगरवाडी जवळचा डोंगर खचल्याने परिसरातील घरे धोक्यात आहेत. चिपळूण मध्ये कलंबट येथे भेगा पडल्याने जमिनीचा भाग मोठ्या प्रमाणावर खचला आहे. तेथील घरे ही धोक्यात आली आहेत.
यावर्षी पावसात डोंगर खचणे, जमिनीला भेगा पडणे हे प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. असे प्रकार का होतात, याची तपासणी करून खबरदारीच्या उपाय योजना आखण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अन्यथा माळिणसारखी घटना रत्नागिरीत घडण्याचा धोका संभवतो.
संरक्षण क्षेत्रात सार्वजनिक उपक्रमाना आणि आयुध निर्माण कारखाना मंडळाला ब....
अधिक वाचा