By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 03:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
शहरातील क्रांतींनगर झोपडपट्टीत राहणारा शंकर मानप्पा ढोत्रे हा 18 वर्षाचा तरुण साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंड जवळील चिरेखाणीत बुडून मृत्यूपावल्याची दुर्घटना घडली. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरनी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
त्या संदर्भात अधिक माहिती अशी की , शनिवारी दुपारी 3 वाजता शंकर हमालीच्या कामावर जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला . परंतु रविवारी सकाळ पर्यंत तो घरी आला नाही. तेव्हा नातेवाइकांनी आजूबाजूला त्याचा शोध घेत असता एक तरुण चिरेखाणीत बुडाल्याची माहिती त्यांना मिळाली, शंकरचा मावस भाऊ गौरव अशोक अलकुंटे याने तेथे जाऊन पाहिले , तर शंकरचा मृतदेह चिरेखाणीत तरंगताना त्याला दिसला. याची माहिती गौरवने तात्काळ शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काल घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि तपासणीसाठी शंकरचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. याबाबत पोलिस अधिक तपस करीत आहेत.
देशभरात डॉक्टरांच्या सुरक्षे बाबत अलीकडेच आंदोलन झाल्यानंतर काल मुंबईच्य....
अधिक वाचा