By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 12:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
कोरोना विषाणुने जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही याची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारडून कोरोना संदर्भात नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना येत आहे. दरम्यान रत्नागिरीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. या डॉक्टरचे सॅम्पल घेतले गेले मात्र ते पुण्याला पाठवलेच नाहीत अशी गंभीर बाब देखील इथे निदर्शनास आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी हे सॅम्पल पाठवले अपेक्षित होते. पण त्यांनी हे सॅम्पल पुण्याला पाठवले नसल्याचा आरोप महिला डॉक्टरने जिल्हा शल्य चिकित्सकांवर केलाय.
महिला डॉक्टरने स्वतःला कॉरंटाईन करुन घेतलंय. जिल्हा शल्य चिकित्सक जीवाशी खेळत असल्याचा महिला डॉक्टरचा आरोप आहे. यासंदर्भात महिला डॉक्टरने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.
कोरोनाशी लढा देणाऱ्या महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेला मोठं यश मिळताना दि....
अधिक वाचा