ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट कपात

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 06, 2019 12:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट कपात

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक पार पडली. बेरोजगारी आणि वाढत्या महागाईमुळे या पतधोरणात व्याजदरात कपात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. ही अपेक्षा अखेर खरी ठरली असून त्यामुळे उद्योग जगतामध्ये सकारात्मक पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तर रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्जांचे हप्ते स्वस्त होणार असल्याने सामान्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने गुरुवारी अपेक्षेप्रमाणे रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली. त्यामुळे ६ टक्क्यांवर असणारा रेपो रेट आता ५.७५ इतका झाला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेट अनुक्रमे ५.५० आणि ६ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेच्या  पतधोरण समितीने एकमताने हा निर्णय घेतला.

पतधोरणात रिझर्व्ह बँकेने भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात ७.२ टक्के दराने विकास करेल, असे म्हटले होते.

मागे

पालघरमधल्या केतन जाधव याने, सर केले जगातील सर्वोच्च शिखर
पालघरमधल्या केतन जाधव याने, सर केले जगातील सर्वोच्च शिखर

पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या केतन जाधव या आदिवासी मुलाने ....

अधिक वाचा

पुढे  

बिबट्याचा हल्ला, चौघे गंभीर- संगमनेर
बिबट्याचा हल्ला, चौघे गंभीर- संगमनेर

कौठे कमळेश्वर शिवारात शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्या....

Read more