ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आरबीआय उपगव्हर्नर विरल आचार्य यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 24, 2019 01:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आरबीआय उपगव्हर्नर विरल आचार्य यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा

शहर : देश

रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे. वैयक्तीक कारणांसाठी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. ते आता पुन्हा अध्यापनाकडे वळण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 6 महिन्यांनी त्यांच्या कार्यकाळ पूर्ण होणार होता. आज दुपार पर्यंत आरबीआय याप्रकरणी अधिकृत वक्तव्य करु शकते.

विरल आचार्य यांनी 2017 मध्ये आरबीआयमध्ये कमान संभाळली आणि त्यांना 2020 मध्ये त्यांना इथे 3 वर्षे पूर्ण होतील. पण त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनामाच्या पुष्टी झाल्यास आरबीआयमध्ये महत्त्वाची दोन पदे रिक्त राहतील. आचार्य यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर एनएस विश्वनाथ 3 जुलै 2019 निवृत्त होत आहेत. विश्वनाथ हे बॅंकींग रेग्युलेशन एंड रिस्क मॅनेजमेंटचे प्रमुख आहेत.

आरबीआयमध्ये येण्याआधी विरल आचार्य अध्यापन क्षेत्राशी संबंधित होते. ते न्युयॉर्क विश्वविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. आर्थिक क्षेत्रात प्रणालीगत जोखीम क्षेत्रात विश्लेषण आणि संशोधनासाठी ते ओळखले जातात. आयआयटी मुंबईचे विद्यार्थी असलेल्या आचार्य यांनी 1995 मध्ये कम्प्यूटर सायन्स आणि इंजिनिअरींगची पदवी घेतली. तसेच न्यूयॉर्क विश्वविद्यालयात 2001 साली अर्थ विषयात पीएचडी केली. 2001 ते 2008 पर्यंत आचार्य लंडन बिझनेसमध्ये होते.

मागे

'बालाकोट एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तान LoC पार करु शकला नाही'
'बालाकोट एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तान LoC पार करु शकला नाही'

पुलवामा नंतर भारताच्या बालाकोट एअर स्ट्राईकवर भारतीय वायुसेनेचे प्रमुख ब....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, कोकणात मुसळधार
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, कोकणात मुसळधार

अखेर जून महिन्याच्या अखेरीस पावसाने चांगलीच हजेरी लावली. मुंबईसह नवी मुंबई....

Read more