By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 06, 2019 04:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम अर्थात आरटीजीएस फंड ट्रान्सफर आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरसाठी (एनईएफटी) घेण्यात येणारे शुल्क रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. डिजिटल पेमेंटला चालना देण्याच्या उद्देशाने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
एनईएफटीसाठी बँका १० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेवर २.५० रुपये, १० हजारांहून अधिक, मात्र १ लाखापर्यंतच्या रकमेवर ५ रुपये, रुपये १ लाख ते २ लाखांपर्यंतच्या रकमेवर १५ रुपये आणि २ लाखांवरील रकमेवर २५ रुपये शुल्क आकारत होत्या. आरबीआय रुपये २ लाख ते रुपये ५ लाखांपर्यंतच्या आरटीजीएससाठी २५ रुपयांसह टाइम वॅरिंग शुल्क घेत होती. तसेच ५ लाखांहून मोठ्या रकमेसाठी बँकेकडून ५० रुपये घेतले जात होते. बँकेकडून ८ तास ते ११ तासांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नव्हते. तर, ११ तासांपासून ते १३ तासांसाठी २ रुपये अतिरिक्त शुल्क, तसेच १३ तास ते १६.३० तासांसाठी ५ रुपये अतिरिक्त शुल्क आणि १६.३० तासांहून अधिक कालावधीसाठी १० रुपये इतके अतिरिक्त शुल्क घेतले जात होते.
कौठे कमळेश्वर शिवारात शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्या....
अधिक वाचा