By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 04, 2019 01:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) व्होडाफोन एम-पैसा (M Pesa) आणि फोन पेसहीत प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) जारी करणाऱ्या पाच कंपन्यांना नियमांचं उल्लंघन करण्याप्रकरणी दंड ठोठावलाय. याशिवाय, नियमांना पायदळी तुटवण्यासाठी 'वेस्टर्न युनियन फायनान्शिअल सर्व्हिसेस इंक' आणि 'मनीग्राम पेमेंट सिस्टम्स इंक' या अमेरिकन कंपन्यांवरही दंड लावण्यात आलाय.
पाच कंपन्यांना ठोठावला दंड
केंद्रीय बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पेमेंट एन्ड सेटलमेंट सिस्टम्स एक्ट, २००७ च्या कलम ३० नुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेनं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पाच कंपन्यांना आर्थिक दंडाची शिक्षा दिलीय.
व्होडाफोन एम पैसावर ३.०५ करोड रुपयांचा दंड लावण्यात आलाय. याशिवाय मोबाईल पेमेंटस्, फोन पे, प्रायव्हेट अॅन्ड जीआय टेक्नॉलॉजी यांच्यावर एक-एक करोड रुपयांचा दंड लावण्यात आलाय. वाय कॅश सॉफ्टवेअर सोल्युशन्सवर ५ लाख रुपयांचा दंड लावण्यात आलाय.
तर, 'वेस्टर्न युनियन फायनान्शिअल सर्व्हिसेस इंक, यूएस'वर २९,६६, ९५९ रुपयांचा आणि 'मनीग्राम पेमेंट सिस्टम्स इंक, यूएस'वर १०,११,६५३ रुपयांचा दंड लावण्यात आलाय.
दुष्काळामुळे राज्यभरात निर्माण झालेल्या तीव्र चारा आणि पाणीटंचाईचा सामना....
अधिक वाचा