ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई महापालिकेत होणार ८७४ जागांसाठी भरती

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 21, 2020 04:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई महापालिकेत होणार ८७४ जागांसाठी भरती

शहर : मुंबई

      मुंबई : मुंबई महानगरपालिकेत लिपिक म्हणजेच कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागा ऑनलाईन परीक्षा घेऊन भरल्या जाणार आहेत. या परीक्षेच्या प्रक्रियेसाठी १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ही सरळ सेवेपैकी रिक्त असलेली ८७४ पदे आहेत. त्यामुळे खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात एकूण ३ हजार अर्ज येणे अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून प्रत्येकी ५०० रुपये आणि मागास व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकडून ३०० रुपये शुल्क घेतले जाणार आहे. 

      सर्व उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीचे अर्ज मागविण्यासाठी अर्जाचा नमूना महाऑनलाईनच्या महारिक्रूटमेंट या वेबसाईटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. भरतीसाठी पालिकेने महाऑनलाईन लिमिटेड कंपनीची निवड केली असून पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाईन व्यावसायिक चाचणी परिक्षा घेण्यात येणार आहे. उद्या बुधवारी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.          

मागे

प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि फिटनेस ट्रेनरवरही जीएसटीची कुर्‍हाड कोसळणार
प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि फिटनेस ट्रेनरवरही जीएसटीची कुर्‍हाड कोसळणार

        मुंबई : इलेक्ट्रिशियन, प्लंबर, ब्युटीशियन्स आणि फिटनेस ट्रेनर आद....

अधिक वाचा

पुढे  

केरळच्या ८ पर्यटकांचा नेपाळमध्ये मृत्यू
केरळच्या ८ पर्यटकांचा नेपाळमध्ये मृत्यू

      तिरुअनंतपुरम- नेपाळच्या एका हॉटलमध्ये आज ८ भारतीय पर्यटकांचे मृत....

Read more