ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

३ दिवसात मुसळधार पावसाचा इशारा, पुण्यात रेड अॅलर्ट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 10:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30

३ दिवसात मुसळधार पावसाचा इशारा, पुण्यात रेड अॅलर्ट

शहर : पुणे

पावसानं सध्या उसंत घेतली असली तरी पुढील तीन दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. मुंबईसह कोकण, गोवा आणि विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाट आणि धरण परिसरात जाणं टाळावं असं आवाहन पुणे वेधशाळेनं केलं आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ अनुपम काश्यपी यांनी सांगितलं आहे.

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूरात आतापर्यंत सरासरीपेक्षा ५६ टक्के जास्त पाऊस झाला आहे. सांगलीमध्ये ४७ टक्के, तर साताऱ्यामध्ये ६६ टक्के जास्त पाऊस झालाय. यंदा पुणे जिल्ह्यातली पावसानं कहर केला आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा तब्बल १३४ टक्के जास्त पाऊस आतापर्यंत पडला आहे. नाशिकलाही यंदा पावसानं झोडपलं असून सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाला आहे. मुंबईतही २९ टक्के जास्त पाऊस पडला आहे.

                                                                     

मागे

कलम 370 रद्द करण्याचा सरकारचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणार का?
कलम 370 रद्द करण्याचा सरकारचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणार का?

2019 च्या निवडणुकीत मतं मागताना भाजपने सांगितलं होतं, आम्ही कलम 370 रद्द करणार. त....

अधिक वाचा

पुढे  

पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपये मदत
पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपये मदत

कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे महापुराचा वेढा पडला आहे. गेले दोन दिवस ....

Read more