By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2019 10:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
आधीच मुसळधार पावसाने कोल्हापूर-सांगली जलमय झाली असतानाच आता येत्या 48 तासात पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर मध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पालघर आणि ठाण्यामध्ये तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कोल्हापूर मधील खिद्रापूर गाव चहू बाजूने पाण्याने वेढल्याने २ हजार नागरिक अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. प्रशासनाच्या बोटी अद्यापही पोहोचलेल्या नाहीत. गावातील वृद्ध, लहान मुले आणि महिलांना तरी बाहेर काढा अशी विनंती ग्रामस्थ करीत आहेत. तर सांगलीतील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मध्यरात्रीच संबंधित दाखल झाले आहेत. पालक मंत्री सुभाष देशमुखही दुपारी बारा वाजेपर्यंत जिल्ह्यात पोहोचणार असल्याचे वृत्त आहे.
कोल्हापूर सांगली जिल्ह्यात ५ व्या दिवशी महापुराचा धोका कायम आहे. राज्यात आतापर्यंत महापुरामुळे २८ जणांचा जीव गेला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अतिवृष्टीचा धोका कायम आहे.
जानेवारीत जाहीर झालेले भारतरत्न पुरस्कार आज राष्ट्रपती रामनाथ कोविन्द या....
अधिक वाचा