ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई, पुण्यातील दारुची दुकानं खुली राहणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 03, 2020 06:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई, पुण्यातील दारुची दुकानं खुली राहणार

शहर : मुंबई

मुंबई, पुणे महानगर मध्ये रेड झोनमध्ये स्टँड अलोन दुकांनाना उद्यापासून परवानगी

( म्हणजे मॉल वगळता ) सिंगल शॉप दुकाने उघडायला परवानगी देण्यात आली आहे. दारूच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे.

स्टँड अलोनमध्ये एका लाईनमध्ये पाच पेक्षा जास्त दुकांनाना परवानगी नाही.

खाजगी बांधकामे करण्यास उद्यापासून परवानगी देण्यात आली आहे.

कॉन्टेंमेंट विभागामध्ये जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर दुकानांना परवानगी नसणार आहे.

रेड झोनमधील काही शहरं वगळता सर्व दुकानं खुली, जाणून घ्या

रेड झोनमध्ये सलूनला परवानगी नसली तरी खाजगी बांधकाम करायला परवानगी असल्याचे सांगण्यात आले आहे.

जरी नोंदणी केलेल्या मजदूर /कामगार / परप्रांतीयांना सरकारच्या परवानगीने रेल्वेने दुसऱ्या राज्यात नेले जात आहे. असे असले तरी महाराष्ट्रात दोन जिल्ह्यांमध्ये प्रवासाला ( कुठलाही झोन असला ) तरी अजूनही परवानगी देण्यात आली नाही. हे जिल्हा बंदीचे आदेश कायम असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

रेड झोनमधील मुंबई, एमएमआर, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका या क्षेत्रात मात्र लॉकडाऊनमध्ये कुठलीही शिथिलता देण्यात आलेली नाही.

रेड झोनमधील मुंबई, एमएमआर, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका ही क्षेत्र वगळून ग्रामीण भागात मॉल्स, शॉपिंग कॉम्पलेक्स वगळून सर्व प्रकारची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

मुंबई, एमएमआर, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका वगळून रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमधील खासगी कार्यालये ३३ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय द्यावा लागणार आहे.

मुंबई, एमएमआर, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका वगळून इतर ठिकाणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील सरकारी कार्यालयात उप सचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती असणार आहे. तर त्याखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ३३ टक्के उपस्थिती अपेक्षित आहे.

 

मागे

मुंबई-पुण्यातली दुकानं उघडायला या अटींसह परवानगी
मुंबई-पुण्यातली दुकानं उघडायला या अटींसह परवानगी

लॉकडाऊनमध्ये रेड झोनमधली दुकानं उघडण्याला राज्य सरकारने अटींसह परवानगी द....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई आणि पुण्यातून फक्त परराज्यातील मजुरांनाच सोडणार
मुंबई आणि पुण्यातून फक्त परराज्यातील मजुरांनाच सोडणार

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना ....

Read more