By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 09, 2021 09:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
रेल्वे मंत्रालयाने 21 मार्च 2020 ते 31 जुलै 2020 पर्यंतच्या रद्द झालेल्या तिकिटांचे पूर्ण पैसे परत करण्याची मुदत वाढवली आहे. विशेष म्हणजे ही तिकिटं रद्द करण्यासाठी आणि रिफंड मिळवण्यासाठीच्या कालावधीत वाढ करुन ही मुदत 6 महिन्यांवरुन 9 महिने केलीय. रिफंडची ही सोय केवळ त्याच रेल्वे गाड्यांना लागू असणार आहे ज्या रेल्वे विभागाकडून रद्द करण्यात आल्या.
आपलं तिकिट ज्या तारखेसाठी बूक केलं होतं त्या तारखेपासून 6 महिन्याची कालमर्यादा पूर्ण होण्याआधी ज्या प्रवाशांनी रेल्वे कार्यालयात तिकिट जमा केले त्यांनाही पीआरएस काऊंटर तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मागील वर्षी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यामुळे 22 मार्च 2020 पासून रेल्वे बंद करण्यात आल्या. अचानक रेल्वे रद्द झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय देखील झाली. लोक अनपेक्षितपणे घरांमध्ये बंद झाले होते. ज्यांनी आधीच तिकिटं बूक केली होती त्यांना ती रद्दही करता आली नाहीत.
आता रेल्वे मंत्रालयाने मागील वर्षी 21 मार्च 2020 ते 31 जुलै 2020 या काळात बूक केलेली तिकिटं रद्द करण्यासाठी 6 ऐवजी 9 महिन्यांचा कालावधी दिलाय. ही तिकिटं रद्द झाल्यानंतर प्रवाशांना पैसे रिफंड मिळणार आहे. याआधी रेल्वेने कोरोनामुळे काउंटर तिकिटं रद्द करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत दिली होती.
Ministry of Railways extends time limit beyond six months for cancellation of PRS counter tickets and refund of fare across reservation counters for the journey period 21.03.2020 to 31.07.2020.https://t.co/QcF2OyxORb pic.twitter.com/27DpTilleF
— Ministry of Railways (@RailMinIndia) January 7, 2021
रिफंडसाठी अटी काय?
रेल्वे विभागाकडून रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची तिकिटं रद्द करुन रिफंडसाठी आधी 3 दिवसांची मुद देण्यात आली होती. नंतर ही मुदत 6 महिने करण्यात आली होती. 139 क्रमांक किंवा आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तिकिट रद्द केल्यानंतर संबंधित प्रवाशांना रिफंड मिळवण्याची मुदत 6 महिने करण्यात आली. मात्र, त्यासाठी ती ट्रेन रेग्युलर टाईम टेबलमधील असणं आवश्यक आहे. ज्या लोकांनी आयआरसीटीसी वेबसाईटवर जाऊन तिकिट बूक केले होते त्यांना रेल्वेने पैसे परत केले आहेत.
कोरोनामुळे ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्ण....
अधिक वाचा