ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

CBSE परीक्षा ऑनलाइन घेण्यास नकार; लेखी परीक्षा होणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2020 11:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30

CBSE परीक्षा ऑनलाइन घेण्यास नकार; लेखी परीक्षा होणार

शहर : देश

देशात कोरोना व्हायरस या महामारीचा मोठा फटका विद्यार्थ्यांच्या परीक्षांना बसत आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येमुळे १० वी आणि १२वीच्या परीक्षा रद्द होणार असल्याच्या चर्चा सर्वदूर पसरत होत्या. आता मात्र CBSEने या सर्व चर्चांचा पूर्णविराम दिला आहे. CBSE बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे परीक्षा ऑनलाईन होणार नसून लिखीत स्वरूपात होणार असल्याचं बोर्ड अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे.

परीक्षा नक्की कधीपासून सुरू होतील यावर सध्या चर्चा सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत लेखी परीक्षा घेतल्या जातील असं वक्तव्य केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी केलं. शिवाय यासंबंधी १० डिसेंबर रोजी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी पोखरियाल बोलणार आहेत.

दरम्यान, २०२१ या वर्षातील १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. परीक्षांचे वेळापत्रक cbse.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

मागे

माफी मागा अन्यथा तोंड काळ करु, बच्चू कडुंचा 'या' मंत्र्याला इशारा
माफी मागा अन्यथा तोंड काळ करु, बच्चू कडुंचा 'या' मंत्र्याला इशारा

मागील काही दिवसांपासून पंजाब, हरियाणा, राजस्थान आदी राज्यातील हजारो शेतकरी....

अधिक वाचा

पुढे  

नियमावली जारी करुन सरकार झोपलं, सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला झापलं
नियमावली जारी करुन सरकार झोपलं, सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला झापलं

देशात कोरोनाच्या वेगाने होणा-या वाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सर....

Read more