By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2020 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : औरंगाबाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूला अनेक बदल होत आहेत. काहींवर बेरोजगारीची वेळ आली आहे, तर अनेकांचे उद्योग ठप्प झाले. मात्र, अशाही स्थितीत नागरिक या आव्हानाचा सामना करत आहेत. दुसरीकडे अशीही उदाहरणं समोर येत आहेत जी माणुसकीच्या नावावर काळिमा फासणारे आहेत. औरंगाबादमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमध्ये एका 90 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आजीबाईंना त्यांच्या नातेवाईकांनीच जंगलात सोडून दिलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबादमधील कच्चीघाटी परिसरात काही नातेवाईकांनी आपल्या 90 वर्षीय कोरोनाबाधित आजींना थेट जंगलात सोडलं. जर्जर म्हाताऱ्या आजींना जंगलात टाकून संबंधित नातेवाईक फरार आहेत. या आजींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर मरणासन्न अवस्थेत जंगलात सोडण्यात आलेल्या आजींची प्रकृती आता स्थिर आहे.
आजीला जंगलात सोडून पळून गेलेल्या नातेवाईकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच या नातेवाईकांना अटक होण्याची शक्यता आहे.
औरंगाबादमधील कोरोनाची स्थिती
औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने 130 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या 3 हजार 757 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यासह एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 16 हजार 243 एवढी झाली आहे. त्यापैकी 11 हजार 960 रुग्ण बरे झाले आहेत. यातील 526 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झ....
अधिक वाचा