ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

COVID Test | रिलायन्सची नवी RT-PCR टेस्ट किट, दोन तासात कोरोनाचा अहवाल कळणार

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2020 07:26 AM 2019-02-12T14:15:30+5:30

COVID Test | रिलायन्सची नवी RT-PCR टेस्ट किट, दोन तासात कोरोनाचा अहवाल कळणार

शहर : मुंबई

देशात कोरोनाचा कहर अजूनही कायम आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये (RT-PCR Test Kit) दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा वेळी रिलायन्स लाईफ सायन्सेज कंपनीने एक अशी आरटी-पीसीआर किट तयार केली आहे, जी जवळपास दोन तासात कोरोना चाचणीचा अहवाल देईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत RT-PCR टेस्टचा अहवाल यायला 24 तासांचा वेळ लागतो (RT-PCR Test Kit).

सूत्रांच्या माहितीनुसार, मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सहाय्यक कंपनी रिलायन्स लाईफ सायन्सेजच्या संगणकीय जीवशास्त्रज्ञांनी (Computational Biologists) भारतात SARS-CoV-2 च्या 100 पैकी अधिक जीनोमचं विश्लेषण केलं आणि COVID-19 झालाय की नाही ते माहित करुन घेण्यासाठी रिअल टाईम पीसीआर (RT-PCR) किट तयार केली आहे.

आरटी-पीसीआर किटला आतापर्यंत गोल्ड स्टॅण्डर्ड मानलं जातं. सूत्रांनुसार, रिलायन्स लाईफ सायन्सेजमध्ये वैज्ञानिकांनी तयार केलेल्या किटला आर-ग्रीम किट (SARS COV2-real-time PCR) असं नाव देण्यात आलं आहे आणि योग्य रिझल्टसाठी ICMR ने याला मान्यताही प्राप्त झाली आहे.

ICMR च्या निकषांवर ही किट किती खरी उतरली?

आयसीएमआरची मान्यता प्रक्रिया या किटच्या डिझाइनचा स्वीकारही करत नाही किंवा नाकारत नाही. तसेच, या किटचा प्रयोग किती सहज करता येईल याबाबतही कुठलं प्रमाण नाही. सूत्रांच्या मते, ही किट SARS COV2 विषाणूच्या ई-जीन, आर-जीन, आरएआरआरपी जीनचा शोध लावू शकते. ICMR च्या परिणामांनुसार, किटमध्ये 98.8 टक्के संवेदनशीलता आणि 98.8 टक्के विशेषज्ञता दिसून येते (RT-PCR Test Kit).

2020 च्या अखेरपर्यंत मृत्यू दर कमी होऊ शकतो

या किटला फर्ममध्ये काम करणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांनी तयार केलं आहे. या किटचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ही सहज उपलब्ध होऊ शकते आणि याचा वापर करणेही अगदी सहज आहे, असं सांगण्यात येत आहे.

तर, रिलायन्स लाईफ सायन्सेजने एका वेगळ्या अभ्यासाचे संकेत दिले आहेत. COVID-19 चा मृत्यू दर 2020 च्या अखेरीस कमी होण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे.

     

मागे

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर
नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर

राज्य अनलॉक होत असलं तरी कोरोनाचा धोका काही कमी होताना दिसत नाहीये. अशात नवी....

अधिक वाचा

पुढे  

निर्भयाची वकील हाथरस पीडितेची केस लढणार, यूपी पोलिसांनी कुटुबियांना भेटण्यापासून रोखले
निर्भयाची वकील हाथरस पीडितेची केस लढणार, यूपी पोलिसांनी कुटुबियांना भेटण्यापासून रोखले

देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया साहूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयात पीड....

Read more