By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2019 03:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मंदीच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दसर्याच्या काळात मोठी खुशखबर दिली आहे. आरबीआयने रेपो दरात पुन्हा एकदा कपात केली आहे.हा रेपो दर सल्लग पाचव्या वेळेला घटवला आहे. त्यामुळे कर्जाच्या व्याजदरात कमी होऊन हप्ता कमी होण्याची चिन्हं आहेत. यंदा रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी केला आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.15 झाला आहे. याआधी रेपो दर 5.40 होता. सलग पाचव्यांदा आरबीआयने रेपो दरात कपात केली आहे.
ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात घट केली होती. त्यामुळे . आता पुन्हा एकदा घट केल्यामुळे नागरिकांना घर किंवा वाहन हफ्ता कमी पडणार आहे.
आरबीआयने सलग पाचव्यांदा रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली. रेपो दरात कपात केल्याने रिव्हर्स रेपो दरातही कपात होते. यापूर्वीच्या चार बैठकांमध्ये आरबीआयने रेपो दरात कपात केली होती. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात सलग पाचव्यांदा रेपो दरात कपात होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यात उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला होता, त्यांच्या जागी शक्तीकांत दास यांची गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर सलग पाच वेळा रेपो दरात कपात झाली.
रेपो दर म्हणजे काय?
रेपो दर किंवा रेपो रेट म्हणजे बँका रिझर्व्ह बँकेकडून ज्या दराने पैसा घेते तो दर. रेपो दर वाढल्यास, बँकांना रिझर्व्ह बँकांना वाढीव व्याजदराने पैसे द्यावे लागतात. त्याचा परिणाम म्हणून बँक आपल्या कर्जदारांचं व्याजदर वाढवते. त्यामुळे रेपो दरात कपात झाल्यास, बँकाही आपल्या कर्जदारांचं व्याजदर कमी करतात. रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळतात. त्यामुळे बँका कर्जदारांना पैसे देताना कमी दरात देऊ शकतात.
दिल्लीमध्ये चार दहशतवादी घुसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे देशात रेड अ....
अधिक वाचा