ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Republic Day: राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा देखणा चित्ररथ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 26, 2021 08:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Republic Day: राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा देखणा चित्ररथ

शहर : मुंबई

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या संचलनात (rajpath parade 2021) सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत संचलनाची जोरदार तयारी सुरु आहे. यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथाचा टिपण्यात आलेला सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजपथावरील संचलनात होणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा संत परंपरेचा इतिहास पाहायला मिळणार आहे. यंदा राजपथावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा फिरता देखावा साकारला जाणार आहे. या चित्ररथात तुकारामांची गाथा, संत साहित्याची महती पाहायला मिळणार आहे. अनेक वारकरीही या चित्ररथावर दिसणार आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत गोरोबा काका, संत जनाबाई यांचा देखावा साकारण्यात आला आहे.

राजपथावरील महाराष्ट्राच्या चित्ररथांची परंपरा

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथांची नेहमीच छाप पडली आहे. सुरुवातीची अनेक वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. मात्र, नंतर महाराष्ट्राचा संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980 मध्ये शिवराज्याभिषेक या महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 1983 मध्ये बैलपोळ्याचा चित्ररथ अव्वल आला होता. 1993, 1994 आणि 1995 अशी सलग 3 वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथांनी राजपथावरील संचलनात बाजी मारली होती. त्यानंतर 2015 मध्ये पंढरीची वारी या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. तर 2018 मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने बाजी मारली होती.

2020 मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला स्थान नाही

मागील वर्षी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सामील झाला नव्हता. 2020 च्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला होता. गेल्यावर्षीच्या संचलनासाठी मराठी रंगभूमीचती 175 वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला होता. पण तो नाकारण्यात आला. गेल्या वर्षी महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या चित्ररथाचाही प्रस्ताव नाकारला होता.

मागे

दिल्लीच्या सीमेवर ट्रॅक्टर रॅली, हजारोंच्या संख्येने शेतकरी सामील होणार
दिल्लीच्या सीमेवर ट्रॅक्टर रॅली, हजारोंच्या संख्येने शेतकरी सामील होणार

केंद्र सरकारने लागून केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्य....

अधिक वाचा

पुढे  

Republic Day Parade 2021 : आज जग पाहणार भारतीय सैन्याची ताकत आणि सांस्कृतिक वारशाची झलक
Republic Day Parade 2021 : आज जग पाहणार भारतीय सैन्याची ताकत आणि सांस्कृतिक वारशाची झलक

आज, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची आणि सांस्कृत....

Read more