ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आरक्षण : सकल मराठा समाज आक्रमक, मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 17, 2020 12:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आरक्षण : सकल मराठा समाज आक्रमक, मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न

शहर : मुंबई

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाजाच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापूरमध्ये गोकुळ महासंघाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्याचबरोबर दूध रोको आंदोलन करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत. आरक्षण वाचवा असे फलक कार्यकर्त्यांनी झळकावले आहेत.

औरंगाबादेत मराठावाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आणि जालन्यात तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्यात आला. यावेळी पोलिसांनी चार ते पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. तसेच मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षण वाचवा अशी मागणी करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत. आरक्षण वाचवा असे फलक कार्यकर्त्यांनी झळकावले आहेत. आज मराठा क्रांती मोर्चातर्फे पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाईल. त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज आक्रमक झाला आहेऔरंगाबादमध्ये आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मराठा मोर्चाचे काही कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना थांबवलं. यावेळी आक्रमक आंदोलकांनी पालकमंत्री सुभाष देसाईंना निवेदनही दिले. दुसरीकडे जालन्यात मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घातला होता.मराठवाडा मुक्ती समंग्राम दिनानिमित्त आरोग्यमंत्री टाऊन हॉल परिसरात ध्वजारोहण करण्यासाठी आले होते. यावेळी ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांना घेराव घालण्यात आला आहे. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आलीय. याप्रकऱणी चार ते पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

 

मागे

मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर आंदोलन, दानवेंच्या घरासमोर ढोल बजाव
मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर आंदोलन, दानवेंच्या घरासमोर ढोल बजाव

मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विविध भागात मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करण....

अधिक वाचा

पुढे  

मराठवाड्याच्या सुखाची, समृद्धीची स्वप्ने पूर्ण करणार - मुख्यमंत्री ठाकरे
मराठवाड्याच्या सुखाची, समृद्धीची स्वप्ने पूर्ण करणार - मुख्यमंत्री ठाकरे

मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संतांची शिकवण आहेच, पण त्याच बरो....

Read more