By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 26, 2019 03:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भारताची शिखर बँक असलेल्या 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'नं आपल्या साठ्यातील सोन्याची विक्री सुरू केलीय. प्रदीर्घ काळानंतर म्हणजेच तब्बल तीन दशकांनंतर आरबीआयनं सोन्याची विक्री केलीय. जालान कमिटीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून आरबीआय गोल्ड ट्रेडिंगमध्ये ऍक्टिव्ह झालीय. कमिटीच्या शिफारसीनुसार, आरबीआय निर्धारीत लाभापेक्षा जास्त लाभ सरकारसोबत शेअर करू शकते. जालान समितीची नियुक्ती गेल्या वर्षी करण्यात आली होती.
रिझर्व्ह बँकेच्या आठवड्याच्या अहवालानुसार, आरबीआयनं आपल्या बिझनेस इअरच्या सुरुवातीपासून अर्थात जुलै महिन्यापासून एकूण ५.१ अब्ज डॉलरचं सोनं खरेदी केलंय तर १.१५ अब्ज डॉलर सोन्याची विक्री केलीय. आरबीआयकडे ऑगस्टच्या शेवटपर्यंत १.९८७ करोड औंस सोनं होतं. तर ११ ऑक्टोबर रोजी फॉरेक्स रिझर्व्हमध्ये २६.७ अब्ज डॉलरचं सोनं होतं.जगभरातील सेंट्रल बँक (आरबीआयप्रमाणे) आपल्या फॉरेक्स एक्सचेंजचा काही भाग सोन्याच्या स्वरुपात ठेवतात. रिझर्व्ह बँक नोव्हेंबर २०१७ पासून सोन्याची थोडी-फार खरेदी करत आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास २० लाख औंस सोन्याची खरेदी आरबीआयनं केलीय.
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प....
अधिक वाचा