By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 01:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
तुमच्या वडिलांच्या पाठीराख्यांनी त्यांची ’मिस्टर क्लिन’ अशी प्रतिमा तयार केली. पण ’भ्रष्टाचारी नंबर 1’ अशा ओळखीनेच त्यांचा शेवट झाला, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याविरोधात केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सर्वच स्तरातून टीका झाली. पण, आता मात्र भाजपला घरचा अहेर मिळाला आहे. कारण भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतो. पण, त्यांनी राजीव गांधींविरोधात ’भ्रष्टाचारी नंबर 1’ असं केलेलं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. राजीव गांधी यांची हत्या केली. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांचा मृत्यू झाला नाही. मी काय कुणीचं यावर विश्वास ठेवू शकत नाही. मी नरेंद्र मोदींचा आदर करतो. पण, राजीव गांधींविरोधात त्यांनी केलेलं विधान चुकीचं आहे असं माजी केंद्रीय मंत्री श्रीनिवास प्रसाद यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. बोफर्स घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांचा उल्लेख करत काँग्रेसला लक्ष्य केलं होतं.
राहुल गांधींचं प्रत्युत्तर
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ’मोदीजी, लढाई आता संपली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुमची तुमच्या स्वत:बद्दल असलेली मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुम्ही वाचू शकणार नाही. माझ्याकडून तुम्हाला खूप सारं प्रेम आणि मिठी, असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर दिलं होतं.
आशियातील सर्वाधिक 300 किलो वजनाच्या महिलेने आपले वजन 86 किलोपर्यंत कमी केले आह....
अधिक वाचा