ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शहीद भारतीय जवान औरंगजेबच्या हत्येचा जवानांनी घेतला बदला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 18, 2019 06:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शहीद भारतीय जवान औरंगजेबच्या हत्येचा जवानांनी घेतला बदला

शहर : jammu

जम्मू काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये ही चकमक झाली. अनंतनागमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती समोर येते आहे. मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये शौकत अहमद डाल याचा देखील समावेश आहे. शहीद जवान औरंगजेब यांच्या हत्येत याचा समावेश होता.

अवंतीपोराच्या पंजगाम गावात सकाळी 130 बटालियन सीआरपीएफ, 55 आरआर आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) ने ही कारवाई केली.जम्मू-काश्मीरमध्ये काही भागात दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. येथे अलर्ट जारी करण्यात आला आहे. खोऱ्यात दहशत पसरवण्यासाठी दहशतवादी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येथे अलर्ट घोषित करण्यात आला आहे.जम्मू-काश्मीर काही दिवसांपासून दहशतवाद्यांसोबत चकमक वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांसोबतच खोऱ्यातील दहशतवाद्यांचा देखील सामना करावा लागत आहे. गुरुवारी देखील पुलवामामध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं.

मागे

नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून अंदमानात दाखल
नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून अंदमानात दाखल

नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून आज अंदमानात दाखल झाले आहे. हवामान विभाग....

अधिक वाचा

पुढे  

दुष्काळात काय उपाययोजना केल्यात; न्यायालयाचा अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या सरकारला सवाल
दुष्काळात काय उपाययोजना केल्यात; न्यायालयाचा अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या सरकारला सवाल

राज्यातील दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या राज्य सर....

Read more