By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2019 05:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जवळचे भाडे नाकारणे , जादा भाडे आकारणीबाबत जाब विचारणार्यार प्रवाशांना मारहाण करणे , अशा प्रकारची मुजोरी करणार्यान रिक्शा चालकांविरोधात आरटीओने जोरदार कारवाईला सुरवात केली आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणजे बिल्ला व परवाना सोबत न बाळगणार्या मुंबई उपनगरातील मुजोर रिक्शा चालकांवर आता मीटर जप्तीची कारवाई परिवहन विभागाकडून केली जाणार आहे. त्यानुसार 695 मीटर जप्त केले असून आणखी 5 हजार 739 रिक्शावर या कारवाईची टांगती तलवार आहे.
भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे याचबरोबर बिल्ला व परवाना न बाळगणे याकरिता 26 फेब्रुवारी पासून मुजोर आरटीओने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वांद्रे पूर्व- पश्चिम, कुर्ला, मुंबई विमानतळ, घाटकोपर, भांडुप ,मुलुंड यासह अन्य काही भागात 8 हजारांहून अधिक रिक्शा चालकांवर कारवाई केली आहे.
आज संपूर्ण देशात भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. मा....
अधिक वाचा