By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 18, 2020 10:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरु आहे.सध्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी, दोन्ही जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यासोबत कोल्हापुरातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होऊन 38 फूट झाली आहे.
कोयना धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी अजुन वाढली आहे. सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 38 फुटांवर पोहोचली आहे. तर पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 39 फूट आठ इंचावर पोहोचली आहे.
कोल्हापुरातील शहर परिसरात पावसाची उघडझाप तर धरणक्षेत्रातील पावसाचा जोर ओरसला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या दोन दरवाजामधून 4 हजार क्यूसेक्सचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून चार दरवाजांमधून सात हजार क्यूसेक्सचा विसर्ग सुरु होता. राधानगरी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 95 बंधारे पाण्याखाली गेली आहेत. खबरदारी म्हणून आंबेवाडी, प्रयाग चिखली गावातील लोकांच स्थलांतर करण्यात आले आहे.
सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट, आरवडे प्लॉट, साईनाथकॉलनी, दत्तनगर, इनामदार प्लॉट येथील 200 लोक स्थलांतरित केले आहेत. येथील लोकं स्वतःहून अन्य ठिकाणी राहण्यास गेले आहेत. सांगली महापालिकेच्या निवारा केंद्रात 36 लोकं स्थलांतरित झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आ....
अधिक वाचा