ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं; रितेश देशमुख यांची मोदींवर टीका

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 02:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं; रितेश देशमुख यांची मोदींवर टीका

शहर : लातूर

लोकसभा निवडणूकीच्या काळात अभिनेते रितेश देशमुख याने काँग्रेसच्या एका व्यासपीठावर जाहीररित्या केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. मोदींच्या 56 इंच छाती या मुद्द्याची खिल्ली उडवताना 56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं, असं त्यांने म्हटलं आहे. रितेशच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रितेश म्हणाला, केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नुसत्याच बढाया मारतात, प्रत्यक्षात ते ज्या गोष्टींचा खुबीने वापर करीत आहेत त्या सर्व काँग्रेसची देणगी आहे.

आज आपण फेसबूक, ट्विटर वापरतो त्यासाठी लागणारा कॉम्प्युटर आणि मोबाईल ही काँग्रेसची देणगी असल्याचे आहे. काँग्रेसने याआधी काहीही केलं नाही मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपणच सर्वकाही करतो आहोत, असे मोदींना वाटते. मात्र, भारताला स्वातंत्र मिळाले हे देखील काँग्रेसचीच देणगी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवावं, असे रितेशने म्हटले आहे. मोदींच्या 56 इंच छाती या मुद्द्यावरुनही टीका करताना रितेश म्हणाला, याबाबत मला प्रियंका गांधींचं वाक्य आठवतं ते म्हणतात, देश चालवायला 56 इंच छाती नव्हे तर एक ह्रदय लागतं, चांगलं मन लागतं. मी पण विचार करीत होतो की 56 इंच छाती म्हणजे केवढी मोठी छाती असते. 56 इंचाच तर गोदरेजचं कपाट येतं, अशा शब्दांत रितेशने मोदींवर टीका केली.

मागे

वानखेडे स्टेडिमवर देखील राज ठाकरेंचा बोलबाला
वानखेडे स्टेडिमवर देखील राज ठाकरेंचा बोलबाला

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. तसेच भाजपच्य....

अधिक वाचा

पुढे  

 पॅरिसच्या प्राचीन  850 वर्षं जुन्या नोत्र दाम कॅथेड्रलला आग, इमारत भस्मसात.. शिखर कोसळलं
पॅरिसच्या प्राचीन 850 वर्षं जुन्या नोत्र दाम कॅथेड्रलला आग, इमारत भस्मसात.. शिखर कोसळलं

पॅरिसच्या सर्वात प्राचीन आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या नोत्र दाम कॅथेड्रल....

Read more