By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 03:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
भिवंडी तालुक्यात गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिलंजे गावातील 3 महिन्यापूर्वीच बांधलेला पूल रस्त्यात वाहून गेला परिणामी पाच आदिवासी पाड्यांवर जाणारा रस्ता बंद झाल्याने नागरिकांची परवड होत आहे. महत्वांचे म्हणजे हा पूल मागील पावसाळ्यातही वाहून गेला होता. मार्च-एप्रिल 2019 मध्ये पुन्हा बांधण्यात आला होता.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, अनगाव जवळच्या पिलंजे ग्रामपंचायत हद्दीतील भवर पाडा, बेंदरपाडा, नंबरपाडा, वारणापाडा, आगपाडा या आदिवासी पाड्यांवर जाण्यासाठी, जिल्हा परिषदेने एमएमआरडीएच्या माध्यमातून 80 लाख रुपये खर्च करून 2018 मध्ये रस्ता आणि काही ठिकाणी पूल बांधले मात्र पावसामुळे पिलंजे गावातील पूल रस्त्यासह वाहून गेला. शिवाय रस्त्यावर पाइप टाकलेल्या मोर्या्ही दोन ठिकाणी वाहून गेल्या. त्यामुळे आदिवासी पाडयातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी आणि रोजगारासाठी अनगाव-भिवंडीकडे जाण्याकरिता 4 कि.मी. चा वळसा घालून जाव लागत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने आज पुन्हा एकदा रेपो दरात 35 टक्यांनी कपात केल्याने ....
अधिक वाचा