By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 02:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
प्रिन्स हॅरीची पत्नी डचेज ऑफ ससेक्स मेगन मर्केल हिला मुलगा झाला आहे. सोमवारी याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून बाळ आणि बाळंतीण दोघे सुखरूप आहेत.
शाही कुटुंबाच्या या आनंदाच्या क्षणाची माहिती इन्स्टाग्रामवरून देण्यात आली. आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की 6 मे, 2019 च्या पहाटे ड्यूक आणि डचेज ऑफ ससेक्स या जोडप्याला मुलगा झाला आहे. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. शाही कुटुंबाच्या या खास क्षणांसाठी उत्सुकता दाखवणार्या आणि प्रार्थना करणार्या देशवासीयांचे आभार, असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगल मर्केल यांनी गेल्या वर्षी 19 मे, 2018 ला विवाह केला होता. याआधी किंग्स्टन पॅलेसने 8 नोव्हेंबर, 2016 ला दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी दोघांनी विवाह केला होता. गेल्या महिन्यामध्ये मर्केल बाळंतपणाच्या रजेवर गेली होती. अखेर सोमवारी पहाटे तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
धुळ्यामधील देवपूरमधील गल्ली नंबर 7 एकवीरा देवी मंदिराजवळील एका घरात अचानक ....
अधिक वाचा