ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'टीआरपी वाढवण्यासाठी ‘रिपब्लिक’कडून घेतले १ कोटी'

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 03, 2020 10:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'टीआरपी वाढवण्यासाठी ‘रिपब्लिक’कडून घेतले १ कोटी'

शहर : मुंबई

टीआरपी घोटाळ्या प्रकरणी ‘रिपब्लिकवाहिनीसमोरील अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या याप्रकरणी ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एका आरोपीने ‘रिपब्लिकवाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी दरमहा १५ लाख रूपये  मिळत असल्याचे कबुल केले. अभिषेक कोळावडे असं या आरोपीचं नाव आहे. कृत्रिमरित्या टीआरपी वाढविण्यासाठी जानेवारी ते जुलै हे सात महिने आरोपीला दरमहा १५ लाख रूपये मिळत होते. म्हणजे दरमहा १५ लाख रूपये प्रमाणे मिळणारी रक्कम १ कोटी रूपयांच्या घरात आहे. वरील गोष्टीची माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात  दिली आहे.

त्याचप्रमाणे यातील काही रक्कम वितरक असलेल्या आशीष चौधरी याच्या क्रिस्टल ब्रॉडकास्ट कंपनीच्या कार्यालयात स्वीकारली असून उर्वरित रक्कम हवाला माध्यमातून आल्याचे त्याने म्हटले आहे. आशी माहिती मिळताच पोलिसांनी चौधरीच्या घराची आणि ऑफिसची झडती घेतली. यामध्ये ११ लाख ७२ हजार रुपये अभिषेक याच्या घरातून दोन लाख रुपये तर, अशीष याच्या कंपनी कार्यालयातून हस्तगत करण्यात आले.

दरम्यान, मॅक्स मीडिया चालवणाऱ्या अभिषेक कोळावडेने चौकशीमध्ये आशीष चौधरीचं नाव घेतल्याने २८ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलीस अद्यापही चौकशी करत आहेत. याशिवाय याप्रकपरणी  अन्य आरोपी रमजी वर्मा, दिनेश विश्वकर्मा आणि उमेश मिश्रा यांची देखील नावे समोर आली आहेत.

 

Recommended Articles

मागे

कोरोनामुळे या राज्यात 31 डिसेंबरपर्यंत फटाक्यांवर बंदी
कोरोनामुळे या राज्यात 31 डिसेंबरपर्यंत फटाक्यांवर बंदी

राजस्थान सरकारने दिवाळीच्या आधी फटाके विक्रीवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्र�....

अधिक वाचा

पुढे  

पोलिसांचा दुरुपयोग करत महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी, भाजपचा गंभीर आरोप
पोलिसांचा दुरुपयोग करत महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी, भाजपचा गंभीर आरोप

रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्या�....

Read more