ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महिलांच्या इभ्रतीशी कोणतीही तडजोड नको- मोहन भागवत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 02, 2019 11:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महिलांच्या इभ्रतीशी कोणतीही तडजोड नको- मोहन भागवत

शहर : देश

हैदराबाद महिला पशुवैद्य बलात्कार आणि हत्येचे पडसाद साऱ्या देशभरात उमटताना दिसत आहेत. महिलांशी होणारी ही दुष्कृत्य थांबवत गुन्हेगारांना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी देशातील जनसमुदाय करत आहेत. विविध आंदोलनं आणि मोहिमांच्या माध्यमातून सरकार दरबारी कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. यामध्ये सर्वत क्षेत्रातील दिग्गजांचा सूरही मिसळला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात महिलांच्या इभ्रतीशी आणि त्यांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं ठणकावून सांगितलं आहे.

'महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारनं कायदा केला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. मात्र सरकारवरच सर्व काही सोडून चालणार नाही', असं विधान भागवत यांनी केलं. दिल्लीत गीता प्रेरणा महोत्सवात ते बोलत होते. हैदराबाद अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भागवतांचं हे विधान अतीव महत्त्वाचं ठरत आहे. महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोण शुद्ध हवा. त्याची सुरुवात आपल्या घरातून व्हावी, असंही भागवत म्हणाले.

प्रत्येक कुटुंबामध्ये अशा प्रकारल्या मुल्यांचं पालन केलं गेलं पाहिजे जेथे त्या घरातील मुलं महिलांचा आदर करायला कधीच विसरणार नाहीत आणि कायम त्यांच्याकडे शुद्ध नजरेने पाहतील. प्रत्येक कुटुंबातच मुलांना स्वत:च्या अपेक्षांर आणि एकंदरच स्वत:वर नियंत्रण ठेवण्याची शिकवण दिली गेली पाहिजे, असे स्पष्ट विचार भागवत यांनी मांडले

मागे

दगडाने ठेचण्यापासून ते फाशी, बलात्काराच्या गुन्ह्याला कुठे कोणती शिक्षा ?
दगडाने ठेचण्यापासून ते फाशी, बलात्काराच्या गुन्ह्याला कुठे कोणती शिक्षा ?

तेलंगणामध्ये महिला डॉक्टरसोबत बलात्कार आणि हत्येनंतर संपूर्ण देशात संताप....

अधिक वाचा

पुढे  

उच्च न्यायालयाकडून सोनई हत्याकांडातील पाच आरोपींची फाशीची शिक्षा कायम
उच्च न्यायालयाकडून सोनई हत्याकांडातील पाच आरोपींची फाशीची शिक्षा कायम

राज्यभरात गाजलेल्या सोनई हत्याकांड प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चार आ....

Read more