By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2020 02:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
आरबीआयनं आज एक मोठी घोषणा केली असून, 2020 डिसेंबरपासून 24 तास 365 दिवस RTGS सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच इन्स्टंटद्वारे पैसे हस्तांतरित करणंही सहजसोपं होणार आहे. आठवड्याच्या सात दिवसांतील 24 तासांत कोठेही, कधीही पैसे पाठवणं आता शक्य होणार आहे. ऑनलाइन बँकिंग निधी हस्तांतरणाची आरटीजीएस (Real Time Gross Settlement) सेवा 24 तास 365 दिवस वापरता येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)नं केली आहे. आरबीआयकडून ऑनलाईन मनी ट्रान्सफर-आरटीजीएस (Real Time Gross Settlement) सुविधा 24 तास सुरू केली जाणार आहे. आरटीजीएस सुविधा डिसेंबर 2020पासून 24×365 उपलब्ध असेल. यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाऊ शकतात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)ने ऑक्टोबरच्या पतधोरणामध्ये RTGS 24 तास सुरू करण्याची घोषणा केली आहे. एका बँकेतून दुसर्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्याचे बरेच पर्याय आहेत. त्यापैकी सर्वात लोकप्रिय RTGS, NEFT आणि IMPS आहेत.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये NEFTची सेवादेखील 24 तास सुरू करण्यात आली होती.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, डिसेंबर 2020पासून RTGS सेवा 24 तास उपलब्ध असेल. 24x7x365 तत्त्वावर रिअल टाइम पेमेंट सिस्टमवर मोठ्या प्रमाणात व्यवहार उपलब्ध करून देणार्या काही देशांच्या यादीमध्ये भारताचादेखील समावेश झाला आहे. या टप्प्यात मोठ्या मोबदल्याच्या पेमेंट इको-सिस्टम(ECO SYSTEM)मध्ये नवनिर्मितीला चालना मिळेल आणि व्यवसाय करण्यास सोयीस्कर ठरेल. सध्या आरटीजीएस सेवा सुट्टीच्या दिवशी वापरता येत नाही, परंतु ती डिसेंबरपासून उपलब्ध होईल. किमान दोन लाख रुपयांचे व्यवहार आरटीजीएसद्वारे करता येतील.
आता काय आहे वेळ?
आतापर्यंत सकाळी 9 ते संध्याकाळी साडेचार या वेळेत फक्त बँकेच्या कार्यालयीन दिवसात RTGSची सेवा वापरता येत होती. शनिवारी दुपारी अडीचपर्यंत ही सुविधा उपलब्ध होती. बँक सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणताही व्यवहार करता येत नाही. आरटीजीएसकडून पैसे पाठविण्यासाठी नाममात्र शुल्क द्यावे लागते, जे आपण आपल्या बँकेच्या माध्यमातून देऊ शकता.
RTGS म्हणजे काय?
RTGS म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट(Real Time Gross Settlement). आरटीजीएस ही सर्वात वेगवान मनी ट्रान्सफर सेवा आहे. एनईएफटीकडून पैसे पाठविल्यानंतर क्रेडिट मिळविण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्याच वेळी आरटीजीएसकडून पैसे त्वरित पोहोचतात. आरटीजीएसचा उपयोग मोठ्या प्रमाणात म्हणजे 2 लाखांपेक्षा जास्तीची रक्कम पाठविण्यासाठी केला जातो. जर काही कारणास्तव पैसे दुसर्याच्या खात्यावर पोहोचले नाहीत, तर संपूर्ण रक्कम आपल्या खात्यावर परत पाठविली जाते. आरटीजीएस सेवा कोणताही खातेदार वापरू शकतो
RTGS कसे वापरतात?
आपण बँक शाखेत जाऊन किंवा ऑनलाइन बँकिंगद्वारे आरटीजीएस करू शकता. आपण घरातून त्वरित पैसे हस्तांतरित करू शकता. ऑनलाईन फंड ट्रान्सफरमध्ये तुम्ही आरटीजीएसबरोबर पर्याय निवडा आणि लाभकर्त्याचे बँक तपशील जोडून ठेवा. त्यानंतर आपल्याला पाठवायची असलेली रक्कम टाकून ती सबमिट करा.
आरटीजीएसवर शुल्क आकारण्यास किती वेळ लागतो?
बँका आरटीजीएस सेवेसाठी आपल्याकडून शुल्क घेतात. फक्त पैसे पाठवणाऱ्याकडूनच हे शुल्क आकारते जाते. पैसे घेणाऱ्यास कोणतेही शुल्क लागत नाही.
2 लाख ते 5 लाख – 30 रुपये
5 लाखांपेक्षा जास्त- 55 रुपये
राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ, असं नुसतं बोलण्यापेक्षा या सगळ्....
अधिक वाचा