By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 21, 2020 11:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई पोलिसांकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सामन्यांसाठी सुरक्षा पुरवली जाते. ज्यासाठी मुंबईतील क्रिकेट सामन्यांसाठी काही शुल्कही आकारले जाते. पण, विविध सामन्यांसाठी आकारलेले १४.८२ कोटी रुपये थकीत असून मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला ३० स्मरणपत्रेही पाठवली असल्याची माहिती समोर आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्याकडून ही माहिती समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन 30 स्मरणपत्रे पाठवूनही 14.82 कोटी थकबाकी भरण्यास तयार नसल्याचे कळत आहे. गलगली यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला विविध क्रिकेट सामन्यांसाठी दिलेली सुरक्षा आणि त्यासाठी लागणा-या सुरक्षा शुल्काची विषयी माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून माहिती मागितली होती. ज्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्यांना मागील आठ वर्षांतील विविध क्रिकेट सामन्याबद्दलची माहिती देण्यात आली.
देण्यात आलेल्या माहितीनुसार सामन्यांमध्ये वर्ष २०१३ मध्ये पार पडलेला महिला क्रिकेट विश्वचषक, वर्ष २०१६ चा विश्वचषक टी -२०, वर्ष २०१६ मधील कसोटी सामने, २०१७ आणि २०१८ मध्ये खेळले गेलेली आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे तब्बल १४ कोटी ८२ लाख ७४ हजार १७७ रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नसल्याचं कळालं.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या ८ वर्षात फक्त २०१८ च्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले १.४० कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यासाठी घेतलेल्या सुरक्षा अंतर्गत शुल्क अद्याप आकारलेले गेले नाही कारण किती शुल्क आकारले जावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप आदेश जारी केलेला नाही.
मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की ४ जानेवारी २०२० पर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना ३० स्मरणपत्रे पाठवली आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने शुल्क न भरल्याबद्दल मुंबई पोलिसांनी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्रही लिहिले आहे.
जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्ष....
अधिक वाचा